Homeपब्लिक फिगरएकीकडे दुष्काळ तर...

एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळी.. शेतकऱ्यांनी जगायचं कसं?

राज्यात दुष्काळाची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी मिळत नाही. पाण्याचा विषय खूपच गंभीर झाला आहे. माझ्यासमोर बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत. दुष्काळाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सिरयस नाही. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळी पाऊस.. शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने काल खासदार सुळे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. भारताच्या ज्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचं रक्षण आमच्याकडून नेहमी केलं जाणार आहे, असे सुळे म्हणाल्या.

अभिनेता सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करावा लागेल. सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार धक्कादायक आहे. भररस्त्यावर असं होत असेल तर हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भररस्त्यावर  अशाप्रकारे गोळीबार होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपकी बार गोळीबार सरकार या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे, असेदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार यांच्यावरील टीका ६० वर्षं सुरू आहे. शरद पवार यांच्यावर टीका केली की हेडलाईन होते हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे दररोज शरद पवारांविरोधात कटकारस्थान सुरू आहे. आपलं नाणं गेले ६० वर्षे मार्केटमध्ये खणखणीत वाजत आहे. त्यांना काहीही करून शरद पवारांना संपवायचं आहे, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content