Homeपब्लिक फिगरउर्फी प्रकरणात राज्य...

उर्फी प्रकरणात राज्य महिला आयोगाची भूमिका दुटप्पी!

सार्वजनिक ठिकाणी हिडीस अंगप्रदर्शन करत समाजमनावर विपरित परिणाम करणाऱ्या उर्फी जावेदवर, महिलांचा मान व सन्मान जपण्याची जबाबदारी असलेल्या महिला आयोगाने अद्याप स्वाधिकाराने दखल घेत कठोर कारवाई का केली नाही, असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक, प्रवक्ते गणेश हाके, नांदेड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष चित्ररेखा गोरे आदी यावेळी उपस्थित होते. महिला आयोगाने या प्रकाराची दखल घेतली नसली तरी भाजपा उर्फीचा असा नंगानाच चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

उर्फीच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला आयोगाने ट्विटरवरील बातमीवरून मराठी वेबमालिका ‘अनुराधा’च्या अश्लिल पोस्टरची स्वाधिकाराने दखल घेत तातडीने अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस बजावली. मात्र आयोगाला उर्फीचे कृत्य व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग वाटते, यावरून आयोगाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते, असा दावा त्यांनी केला.

लेकीबाळींवर, महिलांवर लैंगिक अत्याचार होत असताना आपण ज्या समाजात राहतो त्याचे स्वास्थ्य जपण्याची गरज आहे. उर्फीसारखी महिला हे स्वास्थ्य बिघडवत असताना तिच्यावर कारवाई करण्यात आम्हाला वेळ वाया घालवायचा नाही हे महिला आयोगाचे वक्तव्य धक्कादायक आहे. शरीराचे ओंगळवाणे दर्शन घडवणारे उर्फीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असताना मूकदर्शकाचे काम करणाऱ्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसण्याचा अधिकार नाही आणि उर्फीप्रमाणेच महिला आयोगदेखील बेफाम झाला आहे, अशी टीका वाघ यांनी केली.

अपेक्षेप्रमाणे या प्रकरणाला राजकीय रंग चढवत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो हीन प्रयत्न होत आहे तो निंदनीय आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारे असे ओंगळवाणे अंगप्रदर्शन रोखण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांची शिकवण, सावित्रीबाईंचे संस्कार जपण्यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्रित आवाज उठवण्याची गरज आहे. कुणी सोबत येवो अथवा न येवो, समाजस्वास्थ्य जपण्यासाठी भाजपा विषय तडीस नेईपर्यंत लढायला सक्षम आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content