Homeटॉप स्टोरीउद्या उघडणार बिग...

उद्या उघडणार बिग बॉसच्या घराचे दार!

बहुचर्चित आणि आणि तितकाच वादग्रस्तही ठरणारा मराठी बिग बॉस हा रिऍलिटी शो उद्या, रविवारी म्हणजे १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कलर्स मराठीच्या यु ट्यूब चॅनलवर सुरू होत आहे.

हा पहिलाच ग्रँट प्रीमियर शो तब्बल चार तासांचा असेल. यापूर्वीच्या सिझन १ आणि सिझन २प्रमाणेच यावेळचीही थीम अस्सल मराठमोळी असेल. दिग्दर्शक महेश मांजरेकर याहीवेळी या शोचे होस्ट आहेत. या शोची माहिती देण्यासाठी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सिझन २मधील फर्स्ट रनरअप नेहा शितोळे हिने प्रसिद्धीमाध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकही वाट पाहत असलेल्या या शोमध्ये नवे स्पर्धक कोणकोण असतील, टास्क काय असतील, त्यातील भांडणं आणि प्रेम याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता असल्याचं नेहाने सांगितलं. शनिवार-रविवारचा विकेंड शो हा स्पर्धकांसाठी खास असतो. यावेळच्या विकेंड शोच्या डावाचे नाव असेल बिग बॉसची चावडी.

नेहाच्या काही प्रश्नांना पत्रकारांनीही उत्तरं दिली. या शोमध्ये जाण्यासाठी स्पर्धकांकडे कोणकोणते गुण हवेत, या  प्रश्नावर एकाने सांगितलं की, मनःशांती, अपमान सहन करण्याची ताकद आणि महेश मांजरेकर यांचे बोल ऐकण्याची तयारी स्पर्धकांकडे हवी.

बिग बॉसचं घर अतिशय सुंदर आहे.  त्यामुळे पत्रकारांमधून बिग बॉसच्या घरात कोण जाणार याबद्दल आपल्याला उत्सुकता असल्याचं एकाने सांगितलं. सुरुवातीला लॉकडाऊन कसा गेला, यावर पत्रकारांनी आपापले अनुभव शेअर केले.

यावेळी दरवर्षी नावीन्य असलेल्या बिग बॉसच्या ‘अनलॉक एंटरटेनमेंट’ हा लोगो पाहावयास मिळाला. शोमध्ये स्पर्धकांना सकाळी उठवण्यासाठी अलार्मऐवजी एक गाणं लावलं जातं. त्यानंतर स्पर्धक दिवसभर त्या गाण्याचा अर्थ लावत, आता काय घडणार, नवीन पाहुणा घरात येणार का याबद्दल चर्चा करीत असायचे, असं नेहाने आपल्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितलं. घरातल्या वादळापूर्वी वादळ आणणाऱ्या प्रोमोजची एक झलकही प्रेक्षकांना यावेळी पाहायला मिळाली.

बिग बॉसच्या वाढीसाठी टीमची आणि स्पर्धकांची मेहनत कारणीभूत आहे. यानिमित्ताने स्पर्धकांना आपल्या व्यक्तिमत्वातील अडथळे दूर करण्याची संधी मिळते, असं कन्नडा अँड मराठी क्लसपर्सचे हेड रिजनल एंटरटेनमेंटर रवीश कुमार यांनी सांगितलं. हिंदी आणि कन्नड बिग बॉसप्रमाणेच आता मराठी बिग बॉसही vootवर चोवीस तास लाईव्ह पाहता येणार आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content