Homeपब्लिक फिगर‘मी पुन्हा येईन..'च्या...

‘मी पुन्हा येईन..’च्या स्वप्नाला अजून २५ वर्षं?

‘मी पुन्हा येईन’ असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला अजून २५ वर्षं लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आम्ही फासे फिरवणार आहोत असे भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही. गेली २२ वर्षं माजी मुख्यमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे. पण, फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवतानाच सांगितले आहे की, हे सरकार पाचच नाही तर २५ वर्षं टिकणार आहे आणि तेच घडणार असेही ते म्हणाले.

लोकांना मूर्ख बनवण्याचे मोदींचे काम

मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते कळत नसेल किंवा कळूनही लोकांना मूर्ख बनवण्याचे काम ते करत असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली.

मोदींना आजपर्यंत कळलंच नाही की शरद पवार या देशातील कृषी सुधाराचे पक्षकार होते.  तेव्हाही आणि आतापण ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते. ते कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची त्यांची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले, ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्र सरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्य सरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही. पण एकमत निर्माण करणे, लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे गरजेचे असताना अजून रेटण्याची भूमिका पंतप्रधान घेत असतील किंवा सरकार करत असेल तर ते योग्य नाही, असेही मलिक म्हणाले.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content