Homeटॉप स्टोरीअनिल परब यांचे...

अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्याचे आदेश!

राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उजवे हात समजले जाणारे शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील अनधिकृत बांधकाम एका महिन्यात पाडण्याचे आदेश लोकायुक्त वी. एम. कानडे यांनी दिले आहेत.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा इमारत क्र. ५७ व ५८मधील अनधिकृत बांधकाम एका महिन्याच्या आत पाडून त्याचा अहवाल लोकायुक्त कार्यालयाकडे म्हाडाने सुपूर्द करावा असा आदेशही त्यांनी दिला.

भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. किरीट सोमैया यांनी, अनिल परब वांद्रे पूर्व येथील म्हाडा कॉलनीच्या इमारत क्र. ५७ व ५८मधील मोकळ्या जागेत अनधिकृत कार्यालय बांधून त्याचा स्वतःचे कार्यालय म्हणून वापर करत असल्याची तक्रार लोकायुक्तांकडे केली होती. हे बांधकाम अनधिकृत घोषित करण्यात आले आहे. परंतु, मंत्र्यांच्या दबावामुळे म्हाडा हे अनधिकृत बांधकाम पाडत नाही, अशी तक्रारही त्यांनी लोकायुक्तांकडे मार्च महिन्यात केली होती.

गेले ३ महिने या याचिकेची सुनावणी लोकायुक्तांकडे सुरू होती. गेल्या आठवड्यात या याचिकेची अंतीम सुनावणी लोकायुक्त न्या. वी. एम. कानडे यांच्यासमोर झाली. त्यात जून व जुलै २०१९मध्ये २ वेळा म्हाडाने अनिल परब यांना इमारत क्र. ५७ व ५८मधील त्यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्याचे आदेश दिले होते. अनिल परब यांनी हे बांधकाम तोडले नाही म्हणून म्हाडाने पोलीस व महानगरपालिकेची मदत मागितली होती, हे स्पष्ट झाले.

अनिल परब

अनिल परब मंत्री झाल्यावर त्यांनी म्हाडावर दबाव आणला. भाजपा नेते डॉ. किरीट सोमैयांनी यासंदर्भात लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली व सुनावणीदरम्यान हे कार्यालय अनिल परब यांचे असल्याचे सिद्ध होत आहे आणि ते कार्यालय अनधिकृत आहे म्हणून पाडावे अशी मागणी केली. सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण सचिव मिलींद म्हैसकर, म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांनी लोकायुक्तांसमोर हे बांधकाम अनधिकृत असल्याचे मान्य केले.

लोकायुक्तांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे बांधकाम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाडण्यात येईल असे मान्य केले. हे अनधिकृत बांधकाम पाडल्यावर एका महिन्याच्या आत कार्यालयात अहवाल सादर करावा असे निर्देश लोकायुक्तांनी राज्य सरकारला दिले आहेत.

उद्या आणखी एका मंत्र्याचा घोटाळा जनतेसमोर

दरम्यान, भाजपा नेते डॉ. सोमैया यांनी उद्या राज्यातल्या आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघड करणार असल्याचे आज जाहीर केले. आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, छगन भुजबळ आदी अनेक नेत्यांचे घोटाळे उघड करण्यात सोमैया यांनी पुढाकार घेतला होता.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content