Homeहेल्थ इज वेल्थखाजगी रूग्णालयांत कोव्हिशिल्ड...

खाजगी रूग्णालयांत कोव्हिशिल्ड ७८० रूपयांनाच!

देशातल्या खाजगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या कोरोना प्रतिबधक लसींचे दर केंद्र सरकारने आज निश्चित केले. खाजगी रूग्णालयांमध्ये कोव्हिशिल्डच्या लसीची एक मात्रा (डोस) ७८० रूपयांना तर कोव्हॅक्सिनचा एक डोस १४१० रूपयांना मिळेल. स्पुटनिक-व्ही लसीचा एक डोस ११४५ रूपयांना उपलब्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले.

या लसींच्या किंमती आज केंद्र सरकारने जाहीर केल्या. या किंमतीत वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) तसेच सेवाकर (सर्व्हिस चार्ज)चे १५० रूपये समाविष्ट आहेत. याचाच अर्थ या किंमतीपेक्षा जास्त दराने कोणत्याही खाजगी रूग्णालयात कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध होणार नाही. या दरांपेक्षा जास्त किंमतीने कोणत्याही रूग्णालयात लसीकरण होत असेल तर त्याविरूद्ध कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर सोपविण्यात आली आहे.

कोव्हिशिल्डच्या २५ कोटी आणि कोव्हॅक्सिनच्या १९ कोटी मात्रांची होणार खरेदी

लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘पूर्ण जबाबदारी सरकारकडे’ अशा दृष्टिकोनातून राज्ये व केंद्राशासित प्रदेशांना भारत सरकार १६ जानेवारी २०२१पासून पाठबळ देत आहे. केंद्र सरकारला प्राप्त झालेल्या विविध सूचना आणि प्रस्तावांच्या आधारे १८ वर्षे वयापुढील सर्व प्रौढांसाठी, तिसऱ्या टप्प्यात १ मे २०२१पासून लसीकरण खुले करण्यात आले. आता, देशव्यापी लसीकरण मोहीम आणखी सार्वत्रिक करण्याच्या उद्देशाने, १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना सरकारी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या मात्रा विनामूल्य दिल्या जाणार आहेत.

राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हे बदल करण्याची पंतप्रधानांनी काल घोषणा केल्याबरोबर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’कडे कोव्हिशिल्डच्या २५ कोटी मात्रांची, तर ‘भारत बायोटेक’कडे कोव्हॅक्सिनच्या १९ कोटी मात्रांची मागणी नोंदवली आहे.

कोविड-१९ प्रतिबंधक लसींच्या या ४४ कोटी मात्रा आतापासून मिळण्यास सुरुवात होऊन डिसेंबर २०२१पर्यंत त्यांचा पुरवठा पूर्ण होणार आहे. या दोन्ही लसींच्या खरेदीसाठी ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ आणि ‘भारत बायोटेक’ यांना ३०% रक्कम आगाऊ अदा करण्यात आली आहे.

अजूनही १.१९ कोटींपेक्षा अधिक मात्रांचा साठा उपलब्ध

मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत २४ कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (२४६५४४०६०) राज्ये/ केन्द्रशासित प्रदेशांना उपलब्ध केल्या आहेत. वाया गेलेल्या मात्रांसह एकूण २३४७४३४८९ मात्रा देण्यात आल्या आहेत. आज सकाळी ८ वाजेपर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही १.१९ कोटींपेक्षा जास्त (११९४६९२५) मात्रांचा साठा उपलब्ध होता.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content