Homeमुंबई स्पेशलचला देऊया मदतीचा...

चला देऊया मदतीचा एक हात.. नगरसेवक संदीप पटेल

रत्नागिरी जिल्ह्यात सतत चाललेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चिपळूणसारख्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपण सारेच समस्त चिपळूणकरांसाठी प्रार्थना करत आहोत. या प्रार्थनेसोबत आपण जर प्रयत्नांची साथ दिली तर समस्त चिपळूणवासियांना ह्याचा खूप मोठा आधार होईल. म्हणून आपण सर्वांनी लागणाऱ्या प्राथमिक वस्तू चिपळूणकरांसाठी दान करून त्यांना बळ देऊ, असे आवाहन गोरेगावातले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संदीप पटेल यांनी केले आहे.

तौक्ते चक्रीवादळमुळे कोकणात झालेल्या नुकसानग्रस्त भागातील बांधवाकरिताही नगरसेवक पटेल यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टीच्या वॅार्ड क्र. ५८तर्फे मदतीचा हात देण्यात आला होता.

जनतेने मदतीसाठी लागणारे साहित्य जसे की, टूथ ब्रश, टूथपेस्ट, साबण (कपड्याचा/अंघोळीचा), पॅकिंग पिशव्या, गार्बेज बॅग, सॅनिटरी पॅड, टॉवेल, चादर, मच्छर अगरबत्ती, मेणबत्ती, माचिस, सुकाखाऊ (बिस्किट, फरसाण वगैरे), युज अँड थ्रो डिश, ताट, वाटी, लहान मुलांचे किट, ORS, चप्पल, डाळ, तांदूळ, मीठ, तेल, तिखट, गहू/तांदूळ पिठ, दूध पावडर, पिण्याच्या पाप्याच्या बाटल्या/बाटला व इतर गृहपयोगी वस्तू (भांडी) अशा  अत्यावश्यक वस्तू इत्यादी स्वीकारल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

साहित्य जमा करण्याचे ठिकाण

नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय, सिद्धार्थनगर, गोरेगाव (प).

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content