Homeचिट चॅटचेंबूर जिमखाना राज्य...

चेंबूर जिमखाना राज्य कॅरम स्पर्धा शनिवारपासून 

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शनिवारी, २० जुलैला सकाळी ९ वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात होत आहे तर महिला गटांच्या सामन्यांना २१ जुलैला प्रारंभ होईल.

पुरुष एकेरी गटात ३२० तर महिला एकेरी गटात ५० खेळाडूंनी भाग घेतला असून पुरुष एकेरी गटातील विजेत्याला रोख रुपये २५ हजार तर महिला एकेरी गटातील विजेतीला रोख रुपये ८ हजारांचे बक्षिस देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या सामन्यांचे तसेच उपउपांत्य फेरीपासूनच्या सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे. चालू वर्षी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आपले ७०वे वर्ष साजरे करत असून यंदाच्या मोसमातील ही चौथी स्पर्धा आहे.

पुरुष एकेरी गटात ५८ गुण मिळविणाऱ्या मुंबईच्या मोहम्मद घुफ्रानला प्रथम मानांकन देण्यात आले आहे, तर ४३ गुण मिळविणाऱ्या मुंबईच्या विकास धारियाने द्वितीय मानांकन प्राप्त केले आहे. महिलांमध्ये ७१ गुणांनिशी आघाडीवर असणाऱ्या मुंबईच्या काजल कुमारीला अग्र मानांकन देण्यात आले असून ५८ गुण प्राप्त करणाऱ्या ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने द्वितीय मानांकनाचा मान मिळविला आहे.

स्पर्धेतील मानांकन असे..

पुरुष एकेरी: १) महम्मद घुफ्रान (मुंबई), २) विकास धारिया (मुंबई), ३) अभिजित त्रिपणकर (पुणे), ४) प्रशांत मोरे (मुंबई), ५) संदीप दिवे (मुंबई उपनगर), ६) झैद फारुकी (ठाणे), ७) रहिम खान (पुणे), ८) पंकज पवार (मुंबई).

महिला एकेरी: १) काजल कुमारी (मुंबई), २) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) अंबिका हरिथ (मुंबई), ५) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ६) श्रुती सोनावणे (पालघर), ७) उर्मिला शेंडगे (मुंबई), ८) आएशा खान (मुंबई)

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content