मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चाकेल्यानंतर सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बेस्ट भवनला जात लाड यांनी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. बेस्ट कर्मचाऱ्यांचा १० नोव्हेंबरला होणारा पगारही ३ नोव्हेंबरलाच होणार आहे. त्यासोबतच त्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल,...
राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसिपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.
स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसिपींना प्रत्येकी 10 हजार रुपये, 40 रेसीपींना प्रत्येकी 5 हजार रुपये तर उत्कृष्ट 100 रेसिपींना प्रत्येकी 2 हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील. शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही देश आणि जगभरात लोकप्रिय आहे. राज्याच्या विविध भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी,...
सध्या सुरू असलेल्या कोविड साथरोगामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांवर अग्निशमन वार्षिक सेवा शुल्कासारख्या नवीन शुल्काची आकारणी करणे...
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून विधान भवनाच्या प्रवेशाकरीता कोरोना म्हणजेच कोविड-१९...
सुमारे दीड फूट लांबीची सळई छातीतून आरपार गेलेल्या एका महिलेवर मुंबई महापालिकेच्या सायन हॉस्पिटलमध्ये नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सलग तीन तास एक अत्यंत...
मुंबईतल्या प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिराजवळच्या एका बहुमजली वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या एका भव्य पोलादी ‘प्लेट’वर एक कार उभी केली जाते. पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या रिसेप्शन काऊंटरवर...
मुंबईतल्या शीव (सायन) परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयास (सायन हॉस्पिटल) सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘क्लास–१’ प्रकारातील २ अत्याधुनिक अतिदक्षता...
मुंबई महापालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव आज, १२ जून २०२१ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे.
हाच...
मध्य रेल्वे प्रशासनाच्या विनंतीनंतर मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंडदरम्यान रुळांखालील १५ ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाहमार्गांतला (कल्व्हर्ट) गाळ अवघ्या १५...
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुंबई महापालिकेच्या २४ विभागांतील १०६८ भूखंडावरील २२९ उद्याने, ४३२ मैदाने, ३१८ मनोरंजन मैदाने तसेच इतर ८९ ठिकाणी (मियावाकी पद्धत...