कधीतरी सहज आरशासमोर उभं राहिलं की, आता स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागते. डोळ्यांच्या कडांना दिसणाऱ्या बारीक रेषा आणि कानाशी रेंगाळणारी रुपेरी झालेली बट पाहताना मनात एकच प्रश्न येतो- "हे सगळं कधी झालं? मी तर अजूनही आतून तोच आहे.. तीच आहे." वाढतं वय स्वीकारणं खरंच खूप कठीण असतं. कारण वय म्हणजे फक्त कॅलेंडरवर बदलणारे आकडे नसतात, तर ते आपल्या मनाच्या गाभाऱ्यात होणारे खोलवरचे बदल असतात. लहानपणी आपल्याला वाटायचं की 'मोठं' होणं म्हणजे खूप स्वातंत्र्य मिळेल. पण आता कळतंय की मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा तडजोड जास्त असते. आपली निरागसता, तो...
राज्यातील पर्यटनस्थळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार व्हावा आणि परदेशी पर्यटकांची संख्या वाढावी, याउद्देशाने जयपूर येथे ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारचे (जीआयटीबी) नुकतेच आयोजन करण्यात आले. यामध्ये मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचीही भागीदारी होती.
राजस्थान सरकारचा पर्यटन विभाग आणि भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियनचेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने जीआयटीबीचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिका, कॅनडा, युरोपीय देश ब्रिटन, स्पेन, जर्मनी, पोलंड, रशिया, फ्रान्स, इटली आणि व्हिएतनाम, फिलिपाईन्स, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस यासारख्या आग्नेय देशांमधील विविध भागधारकांसमवेत बी टू बी (बिझनेस २ बिझनेस) बैठकांमध्ये त्यांनी त्यांचा सांस्कृतिक वारसा आणि मोहक लँडस्केप तसेच पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमांची माहिती दिली.
ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये मध्य प्रदेश टुरिझमने ग्वाल्हेर आणि मांडूच्या भव्य किल्ल्यांपासून भोपाळच्या शांत तलावांपर्यंत आणि कान्हा आणि बांधवगडच्या घनदाट जंगलांपर्यंत आपला समृद्ध वारसा दाखवला. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाच्या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक बिदिशा मुखर्जी यांच्या नेतृत्त्वाखाली मध्य प्रदेश पर्यटन शिष्टमंडळाने ट्रॅव्हल उद्योग व्यावसायिक, टूर ऑपरेटर आणि अभ्यागतांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील अद्वितीय आकर्षणे आणि अनुभवात्मक पर्यटनसंधींची माहिती दिली. संवाद सत्रे आणि सादरीकरणाच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील सांस्कृतिक वारसा, वन्यजीव अभयारण्य, तीर्थक्षेत्रे आणि साहसी पर्यटनातील कामगिरी, इव्हेंट्स आणि साहस पर्यटनाची माहिती देण्यात आली.
मुखर्जी यांनी परदेशी पर्यटकांना रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशन अंतर्गत मंडळातर्फे चालविल्या जाणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित पर्यटनाची आणि राज्यातील ओरछा, खजुराहो, चंदेरी, महेश्वर आणि मांडू हे 'वेडिंग डेस्टिनेशन'चे प्रमुख ठिकाण बनविण्यासाठी मंडळाच्या प्रयत्नांची माहिती दिली. यावर्षी ३० ऑगस्ट ते...
केरळमधील बेपोरच्या किनारपट्टीजवळच्या समुद्रात सुमारे 40 सागरी मैलांवरील जझिरा, या भारतीय मच्छिमार नौकेवरील गंभीर आजारी मच्छिमाराची भारतीय तटरक्षक दलाने नुकतीच सुटका केली.
समुद्रात पडून वाहून...
बृहन्मुंबई महानगरपालिका निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ‘हयातीचे दाखले’ दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ ते ०५ मार्च २०२४ या कालावधीत हयातीचे दाखले...
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात आलेले मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान मुंबईतल्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्यानजीक जोगेश्वरीतल्या पूनमनगर येथे आहे. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, त्यांची जीवनपद्धती...
खेळाडूंकडून स्पर्धा जिंकण्यासाठी उत्तेजनात्मक पदार्थांचे सेवन केले जाऊ नये म्हणून जनजागृती करण्यासाठी भारतातील नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा), या संस्थेकडून #PlayTrue ही मोहीम नुकतीच राबवली....
कुहू, या भारतातील अग्रगण्य ऑनलाईन स्टुडण्ट लोन व्यासपीठाने देशातील प्रमुख शैक्षणिक संस्था गॅल्गोटियास युनिव्हर्सिटीसोबत उल्लेखनीय सहयोगाची घोषणा नुकतीच केली. या सहयोगाचा कुहूचे प्रगत तंत्रज्ञान...
इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्या ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आपल्या व्यासपीठावरून प्रत्यक्ष शुल्कमुक्त शॉपिंगचा अनुभव देण्यासाठी अदानी डिजिटल लॅब्स (एडीएल)सोबत नुकताच धोरणात्मक सहयोग केला आहे....
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स, या इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्समधील अग्रणी कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकींच्या इब्लू श्रेणीसाठी बॅटरी वॉरंटीमध्ये मोठ्या वाढीची नुकतीच घोषणा केली.
२५ एप्रिल...