Homeबॅक पेज'नाडा'ने केली डोपिंगविरोधी...

‘नाडा’ने केली डोपिंगविरोधी जनजागृती!

खेळाडूंकडून स्पर्धा जिंकण्यासाठी उत्तेजनात्मक पदार्थांचे सेवन केले जाऊ नये म्हणून जनजागृती करण्यासाठी भारतातील नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा), या संस्थेकडून #PlayTrue ही मोहीम नुकतीच राबवली. या मोहिमेत 12,133हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. वाडा अर्थात जागतिक अँटी-डोपिंग एजन्सी प्ले ट्रू डे या मोहिमेचे अनुसरण करत या मोहिमेद्वारे भारतात स्वच्छ खेळाचे महत्त्व आणि डोपिंगविरोधी पद्धतींबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नाडाची #PlayTrue मोहीम भारतातील खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण क्रीडा समुदायाला डोपिंगविरोधी नियमांची सखोल माहिती देऊन, त्यांना भारतात डोपिंगविरहित स्वच्छ खेळाचा पुरस्कार करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. ही मोहीम 15 ते 30 एप्रिल 2024दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (डबल्यूएडीए)च्या दृष्टीकोनाशी संरेखित, #PlayTrue मोहीम निष्पक्ष खेळ, डोपिंग नाकारणे आणि निष्पक्ष स्पर्धेच्या भावनेला प्रोत्साहन देऊन खेळांमध्ये अखंडता प्रस्थापित

डोपिंग

करण्याचा प्रयत्न करते. #PlayTrue प्रश्नमंजुषा, मी #PlayTrue ॲम्बेसेडर, #PlayTrue प्रतिज्ञा आणि (शुभंकर ) रेखाचित्र स्पर्धा यासह त्याच्या परस्परसंवादी उपक्रमांद्वारे नाडा इंडियाने सहभागींना गुंतवून त्याद्वारे स्वच्छ आणि नैतिक स्पर्धेची संस्कृती वाढवण्याचे प्रयत्न केले.

या मोहिमेत डोपिंगविरोधी नियमांच्या सर्व पैलूंचा अंतर्भाव करणारी अंतर्दृष्टीपूर्ण जागरुकता निर्माण करणारी सत्रे होती. सहभागींना खेळांमध्ये डोपिंगचे परिणाम जाणून घेण्याची, पूरक आहार समजून घेण्याची आणि डोपिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीची भूमिका जाणून घेण्याची संधी मिळाली. भारताच्या क्रीडा समुदायातील प्रत्येक विभागापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात, क्रीडा परिसंस्थेमध्ये सर्वसमावेशक कव्हरेज सुनिश्चित करून, क्रीडापटू, वैद्यकीय व्यावसायिक, शिक्षक, कायदेशीर व्यक्ती आणि पौष्टिक पूरक उत्पादक यांच्यासाठी सत्रे तयार केली गेली.

पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या अपेक्षेने एक लवचिक डोपिंगविरोधी नियमावली तयार करण्याच्या दिशेने सहयोग, अंतर्दृष्टी आणि धोरणांची देवाणघेवाण करण्यासाठी या मोहिमेने खेळाडू आणि भागधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून काम केले. जागतिक मंचावर निष्पक्ष खेळ, सचोटी आणि स्वच्छ खेळाच्या तत्त्वांचे समर्थन करण्यासाठी भारताची अटल वचनबद्धता या संपूर्ण कार्यक्रमात ठळकपणे दिसून आली.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content