Homeबॅक पेजपर्यटकांसाठी आकर्षण ठरतेय...

पर्यटकांसाठी आकर्षण ठरतेय मुंबईतले शिल्पग्राम उद्यान

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात आलेले मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान मुंबईतल्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्यानजीक जोगेश्वरीतल्या पूनमनगर येथे आहे. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, त्यांची जीवनपद्धती यांच्या संकल्पनेवर आधारित हे उद्यान बारा बलुतेदारबरोबर प्राचीन खेळ, नृत्य यांची शिल्पेही विविध भागात उभारण्यात आली आहेत. सध्या हे पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

शिल्पग्राममध्ये या शिल्पांसोबत लहान मुलांना खेळण्याची विविध उपकरणे, संगीतमय कारंजेदेखील उपलब्ध आहेत. खुला रंगमंच, आकर्षक पायवाटा, हिरवळ इत्यादी सुविधांची उपलब्धता असल्याने अनेक आबालवृद्ध त्याचा लाभ घेत आहेत. शिल्पग्राम उद्यान ५५,००० चौ.मी क्षेत्रफळावर वसले असून उद्यान, खेळ, संगीतमय कारंजे, दिव्यांगांसाठी विशेष उपकरणे तसेच विविध कलाकुसरीच्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीसाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.

या सुविधांसोबतच विविध प्रकाराच्या वनस्पती, वेली, फुलझाडे, यांनी शिल्पग्रामची शोभा वाढवली आहे. सध्या बहावा, ताम्हण, सोनमोहोर, चाफा, कैलासपती, कांचन, इत्यादी वृक्ष फुलांनी बहरलेले आहेत. बचतगटांच्या विविध उपक्रमांना योग्य व्यासपीठ मिळवण्याच्या हेतूने शिल्पग्राममध्ये आठवडी बाजारदेखील भरविण्यात येतो. एकंदर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मौजमजा, खेळाबरोबर सुंदर हिरवाई पाहण्यासाठी सर्व आबालवृद्धांनी शिल्पग्रामला भेट नक्की द्यायला हवी, असे मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

शिल्पग्राम बुधवार वगळता सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांच्या वापराकरिता उपलब्ध करण्यात आले आहे. शिल्पग्राममध्ये प्रौढांकरिता  रु. १०/-, तसेच १२ वर्षांखालील मुलांसाठी ५/- प्रवेश शुल्क आकारण्यात येते. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना शिल्पग्राममध्ये निशुल्क प्रवेश दिला जातो.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content