Homeहेल्थ इज वेल्थहोमिओपॅथीः समज -...

होमिओपॅथीः समज – गैरसमज ?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वात मोठी औषधप्रणाली आहे. त्वचा व केसांच्या समस्या, श्वसनविषयक समस्या, मानसिक आरोग्य समस्या, कमी रोगप्रतिकारशक्ती, टॉन्सिलिटिस, मायग्रेन, रजोनिवृत्ती, वजन व्यवस्थापन आणि वंध्यत्व यासारख्या विविध आजारांवरील उपचारामधील गुणकारी परिणामांमुळे अनेक देशांमध्ये या पूरक औषधप्रणालीचा सकारात्मकपणे अवलंब केला जातो. भारत २००,००० नोंदणीकृती होमिओपॅथिक डॉक्टर्स / फिजिशियन्ससह जगामध्ये अग्रस्थानी आहे आणि जवळपास १०० दशलक्ष व्यक्ती उपचारासाठी होमिओपॅथीवर अवलंबून आहेत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी वैद्यकीय प्रणाली असूनही होमिओपॅथीबद्दल अनेक गैरसमज अजूनही अस्तित्त्वात आहेत. डॉ. बत्रा’ज हेल्थकेअरचे संस्थापक व अध्यक्ष पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. मुकेश बत्रा यांनी होमिओपॅथी उपचाराबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

गैरसमज १: होमिओपॅथी उपचार संथगतीने काम करते:

होमिओपॅथीने गेल्या काही वर्षांमध्ये तीव्र आजाराच्या उपचारांमध्ये उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत. परिणामी जुलाब, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखे आजार होमिओपॅथिक उपचारांसह त्वरित बरे होत आहेत. संधिवात, दमा, एलर्जी, चिंता आणि नैराश्य यासारख्या दीर्घकालीन आजारांवर उपचार होण्यास वेळ लागतो, कारण या आजारांवर मुळापासून उपचार केले जातात.

गैरसमज २: होमिओपॅथी हा फक्त प्लेसबो इफेक्ट आहे:

हा एक सामान्य गैरसमज आहे, ज्यामधून निदर्शनास येते की होमिओपॅथीचे परिणाम फक्त मानसिक असतात आणि त्यांचा शरीरातील शारीरिक बदलांशी काहीही संबंध नाही. होमिओपॅथीच्या परिणामकारकतेची वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी करण्यासाठी अनेक क्लिनिकल आणि डबल-ब्लाइण्ड तपासण्या करणत आल्या आहेत. तसेच, होमिओपॅथिक उपचाराने बरे झालेल्या लाखो केसेस वैद्यकीय डेटाद्वारे प्रमाणित केल्या गेल्या आहेत आणि ते त्याच्या वैज्ञानिक परिणामकारकतेचा पुरावा आहेत.

गैरसमज ३: होमिओपॅथी औषधे सुरक्षित नाहीत:

होमिऑपथी हे जगातील सर्वात सुरक्षित औषधोपचारांपैकी एक आहे. याचे कोणतेही घातक किंवा नकारात्मक परिणाम होत नाहीत, कारण ते डायल्यूट केले जाते आणि लहान डोसमध्ये दिले जातात. पण स्वत:हून उपचार सुरू करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सक्षम होमिओपॅथचा सल्ला घ्यावा.

गैरसमज ४: होमिओपॅथीचा इतर उपचारांसह वापर करता येऊ शकत नाही:

होमिओपॅथीचा वापर इतर उपचारांसोबत करता येतो. होमिओपॅथीकडे येणारे रुग्ण अनेकदा दीर्घकालीन तक्रारी घेऊन येतात आणि ते आधीच इतर प्रकारच्या औषधांचे सेवन करत असतात. ते सेवन करत असलेली काही अ‍ॅलोपॅथिक औषधे अचानक बंद करता येत नाहीत. रासायनिक औषध सेवन करणे थांबवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून, होमिओपॅथीचा अवलंब करत इतर प्रकारचे उपचार हळूहळू थांबवणे उत्तम आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content