Homeकल्चर +सावधान! अभिनय अंधःकारात...

सावधान! अभिनय अंधःकारात टाळ्या शोधत असतो!!

“अभिनय शिकविला जाऊ शकत नाही तर तो आतून यावा लागतो. पुस्तकांपेक्षा रोज भेटणार्‍या लोकांना वाचायला शिका. जीवनात आलेले अनुभव व्यक्तीला उत्कृष्ट अभिनय शिकवू शकतो. परंतू अभिनय हा सतत अंध:कारात टाळ्या शोधत असतो. त्यामुळे यातून स्वतःला सावरा”, असे विचार प्रसिद्ध अभिनेता पद्मश्री नाना पाटेकर यांनी नुकतेच व्यक्त केले.

पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे येत्या शैक्षणिक वर्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल’चे उद्घाटन अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, संजय कामटेकर, प्रकुलगुरू डॉ. तपन पांडा, कुलसचिव गणेश पोकळे, प्रसिद्ध क्रिएटीव्ह डायरेक्टर अभिजित पानसे, धिरज सिंग व दूरदर्शनचे माजी संचालक मुकेश शर्मा आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कलाकार होणे म्हणजे आयुष्यभर दु:खी राहणारा. कारण, रोजच्या अभिनयात सुख व दु:ख उधार घ्यावे लागते. यामध्ये आपण स्वतःबरोबरच कुटुंबालाही विसरत जातो. पुढे सर्व गोष्टी जेव्हा लक्षात येतात तेव्हा हातातून सर्व काही निसटलेले असते. रोजच्या जीवनात सुख-दु:खाची व्याख्या बदलली तरच सुखी रहाल. कठिण परिश्रमाच्या आजूबाजूला यश असते. जीवनात काहीच कठिण नाही. त्यासाठी फक्त विचार सकारात्मक ठेवा, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.

अभिजित पानसे म्हणाले की, संघर्षाशिवाय कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत नाही. भारतीय चित्रपटांवर आजही हॉलिवूडचा खूप मोठा प्रभाव दिसतो. बॉलिवूडवर पडलेली विदेशी छाप पुसावयाची आहे. त्यासाठी योग्य फिल्म स्कूलची आवश्यकता आज पूर्ण झाली आहे. येथील प्रॅक्टिकल मातृभाषेत असणार आहे. तसेच १० टक्के विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देऊन मोफत शिक्षण दिले जाईल. येथे प्रथम सेमिस्टरपासून विद्यार्थ्यांना प्रोफेशनल स्टेजवर शिकायला मिळणार आहे.

डॉ. आर. एम. चिटणीस म्हणाले की, सध्याच्या काळात फिल्म इंडस्ट्रीत खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे यात टिकण्यासाठी योग्य शिक्षणाची गरज आहे. या इंडस्ट्रीमध्ये आपला जम बसविण्यासाठी कौशल्य, समर्पण, कठिण परिश्रम, पेशन्स आणि स्वतःचे काही तत्त्व असणे गरजेचे आहे, ज्याआधारे तुम्ही प्रगती करू शकाल.

धिरज सिंग यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. प्रीती जोशी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. याप्रसंगी एनएसडीचे प्रमुख पद्मश्री वामन केंद्रे यांनी स्कूलला शुभेच्छा दिल्या. तसेच नाना पाटेकर यांनी वेबसाईट लॉन्च केली. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या स्कूलची स्थापना करण्यात आली आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content