Homeटॉप स्टोरीआशिष देशमुख यांची...

आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी!

काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्षश्रेष्ठींनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी देशमुख यांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने पाच मार्चला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीला देशमुख यांनी ९ एप्रिलला उत्तर पाठवले होते. हे उत्तर समाधानकारक नसल्याचे समितीने म्हटले आहे. आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्यांची दखल घेत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल आपले प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निष्कासीत करण्यात येत आहे, असे चव्हाण यांनी या पत्रात म्हटले आहे.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content