Thursday, January 30, 2025
Homeकल्चर +अनन्या, पाँडिचेरी, सनी,...

अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे अंतीम फेरीत!

सन 2022 या वर्षातल्या साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मॅन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव आणि हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे याच वर्षातले उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कलादिग्दर्शन महेश कुंडलकर (उनाड), उत्कृष्ट छायालेखन अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मॅन), ओंकार बर्वे (फोर ब्लाइंड मॅन), प्रियंकर घोष (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रन सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनीसंयोजन लोचन कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभातले पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काल एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यावेळी उपस्थित होते.

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर, विजय भोपे, श्रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणेः

१. सर्वोत्कृष्ट कथा: १. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव) २. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मॅन) ३. सुमित तांबे (समायरा)

२. उत्कृष्ट पटकथा: १. इरावती कर्णिक (सनी) २. पूर्वल धोत्रे – अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मॅन) ३. तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)

३. उत्कृष्ट संवाद: १. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २. मकरंद माने (सोयरिक) ३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

४. उत्कृष्ट गीते: १. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव, गाणे: यल्गार होऊ दे) २. अभिषेक रवणकर (अनन्या, गाणे- ढगा आड या) ३. प्रकाश (बाबा) चव्हाण: (फतवा गाणे- अलगद मन हे)

५. उत्कृष्ट संगीत: १. हितेश मोडक (हर हर महादेव) २. निहार शेंबेकर (समायरा) ३. विजय गवंडे (सोंग्या)

६. उत्कृष्ट पार्श्वसंगीत: १. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २. हनी सातमकर (आतुर) ३. सौमिल सिद्धार्थ (सनी)

७. उत्कृष्ट पार्श्वगायक: १. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गीत: भेटला विठ्ठल माझा) २. पद्मनाभ गायकवाड (गुल्हर गीत- का रे जीव जळला) ३. अजय गोगावले
(चंद्रमुखी गीत: घे तुझ्यात सावलीत)

८. उत्कृष्ट पार्श्वगायिका: १. जुईली जोगळेकर (समायारा गीत – सुंदर ते ध्यान) २. आर्या आंबेकर (चंद्रमुखी गीत बाई ग कस करमत नाही) ३. अमिता घुगरी (सोयरिक गीत- तुला काय सांगु कैना)

९. उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक: १. राहूल ठोंबरे – सजीव होवाळदार (टाईमपास 3 गीत: कोल्ड्रींक वाटते गार) २. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गीत- आई जगदंबे) सुजीत कुमार (सनी गीत – मी नाचणार भाई)

१०. उत्कृष्ट अभिनेता: १. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी) ३. ललीत प्रभाकर (सनी)

११. उत्कष्ट अभिनेत्री: १. सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी) २. अमृता खानविलकर (चंद्रमुखी) ३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

१२. उत्कृष्ट विनोदी अभिनेताः १. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री) २. संजय नार्वेकर (टाईमपास 3) ३. भारत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

१३. सहाय्यक अभिनेता: १. योगेश सोमण (अनन्या) २. किशोर कदम (टेरीटरी) ३. सुबोध भावे (हर हर महादेव)

१४. सहाय्यक अभिनेत्री: १. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २. क्षिती जोग (सनी), मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

१५. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता: १. अकुंर राठी (समायरा) २. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव) ३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

१६. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्रीः १. ऋता दुर्गुळे (अनन्या) २. सायली बांदकर (गाभ) ३. मानसी भवालकर (सोयरिक)

याबरोबरच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मितीकरिता आतुर (मे. झेनिथ फिल्म्स), गुल्हर (मे. आयडियल व्हेन्चर), ह्या गोष्टीला नावच नाही (मे. पायस मेडिलीक्स) या चित्रपटांना नामांकन मिळाले आहे तर प्रथम पदार्पण दिग्दर्शनकरिता 4 ब्लाइंड मॅन, गाभ, अनन्या चित्रपटांना नामांकन प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आंतर को-ऑप. बँक बुद्धिबळ: मानस सावंत विजेता   

को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबईतर्फे विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक बुद्धिबळ स्पर्धा प्रथम मानांकित म्युनिसिपल बँकेच्या मानस सावंतने सलग दुसऱ्यांदा जिंकली. एमएससी बँकेच्या आदित्य जोशीविरुध्द मानस सावंतने हत्ती व वजिराच्या सहाय्याने आक्रमक चाली रचल्या आणि नवव्या...

प्रजासत्ताकदिन संचलनात जम्मू-काश्मीर रायफल्स सर्वोत्तम

राजधानी दिल्लीत नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिन संचलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संचलन पथक आणि चित्ररथांचे निकाल जाहीर करण्यात आले असून जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या संचलन पथकाला सर्वोत्तम पथकाचा मान देण्यात आला आहे. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल / इतर पूरक दलांचे...

आयएसआय मार्क नसलेली खेळणी जप्त!

बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने भिवंडीतल्या बेबी कार्ट कंपनीच्या गोदामावर छापा घालून आयएसआय मार्क नसलेली 367 इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल खेळणी जप्त केली. ही खेळणी वैध आयएसआय  प्रमाणन चिन्हांशिवाय साठवण्यात आली होती आणि ती विकलीही जात होती. प्रमाणित नसलेल्या...
Skip to content