Saturday, February 8, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटदुंडीगलच्या वायूसेना अकादमीत...

दुंडीगलच्या वायूसेना अकादमीत झाले संयुक्त दीक्षांत संचलन

भारतीय वायूसेनेच्या फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी शाखेच्या 235 कॅडेट्सचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल दुंडीगलच्या वायूसेना अकादमीमध्ये काल संयुक्त दीक्षांत संचलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल फ्लाईट कॅडेट्सना वायूसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी आढावा अधिकारी म्हणून प्रेसिडेन्ट्स कमिशन प्रदान केले. पदवी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 22 महिलांचा समावेश होता. त्यांना भारतीय वायूसेनेच्या विविध शाखांमध्ये नियुक्ती मिळाली आहे.

या समारंभाला भारतीय वायूसेना आणि संबंधित सेवांमधील अनेक मान्यवर तसेच पदवी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी भारतीय नौदलाचे 9 अधिकारी, तटरक्षक दलाचे 9 अधिकारी आणि परदेशी मित्र देशांचा एक अधिकारी यांनादेखील फ्लाइंग प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल विंग्ज प्रदान करण्यात आले. हे अशा प्रकारचे पहिलेच संयुक्त दीक्षांत संचलन होते, ज्यामध्ये 4 वर्षांपूर्वी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत ग्राउंड ड्युटी शाखांसाठी दाखल झालेल्या 25 कॅडेट्सनादेखील अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. यापैकी 5 अधिकाऱ्यांना प्रशासन शाखेत, 3 जणांना लॉजिस्टिक्स शाखेत आणि 17 जणांना तांत्रिक शाखेत नियुक्त करण्यात आले आहे.

प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख हवाई अधिकारी एयर मार्शल नागेश कपूर आणि वायूसेना अकादमीचे प्रमुख एयर मार्शल एस. श्रीनिवास यांनी वायूसेनाप्रमुखांचे स्वागत केले. परेड कमांडरकडून आरओंना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर अतिशय प्रभावी संचलन करण्यात आले. दीक्षांत संचलनाच्यावेळी अतिशय उत्तम समन्वय आणि ताळमेळ राखत पिलेटस पीसी-7 एमके-टू, हॉक, किरण आणि चेतक हेलिकॉप्टर्स यांचा समावेश असलेल्या चार प्रशिक्षण विमानांनी हवाई सलामी दिली.    

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content