Homeहेल्थ इज वेल्थराज्यात आज ३५...

राज्यात आज ३५ हजारांना कोरोनाची लस!

राज्यात आज ४७७ केंद्रांवर ३५ हजार ८१६ (७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त १४४ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ वर्धा, भंडारा, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. आजपासून लसीकरण सत्राला सुरूवात झाली. उद्या मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र होईल. ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही.

आज सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ७०१ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात आज २६५ जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली आहे.

आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात दैनंदिन लसीकरण झालेले कर्मचारी, टक्के आणि आतापर्यंतची एकूण संख्या): 

अकोला (327, 65 टक्के, 1433), अमरावती (857, 86 टक्के, 3243), बुलढाणा (804, 80 टक्के, 2921), वाशीम (442, 88 टक्के, 1573), यवतमाळ (355, 71 टक्के, 2143), औरंगाबाद (816, 48 टक्के, 3959), हिंगोली (237, 79 टक्के, 1573), जालना (760, 95 टक्के, 2445), परभणी (275, 55 टक्के, 1597), कोल्हापूर (1097, 55 टक्के, 4601), रत्नागिरी (487, 52 टक्के, 1942), सांगली (1326, 78 टक्के, 4065), सिंधुदूर्ग (354, 59 टक्के, 1264), बीड (746, 83 टक्के, 3008), लातूर (974, 75 टक्के, 3081), नांदेड (385, 43 टक्के, 2062), उस्मानाबाद (319, 106 टक्के, 1620), मुंबई (1858, 64 टक्के, 6624), मुंबई उपनगर (3147, 93 टक्के, 10540), भंडारा (565, 113 टक्के, 1803), चंद्रपूर (392, 65 टक्के, 2569), गडचिरोली (645, 92 टक्के, 2215), गोंदिया (530, 88 टक्के, 1797), नागपूर (1344, 61 टक्के, 6111), वर्धा (1315, 120 टक्के, 3960), अहमदनगर (1334, 64 टक्के, 5240), धुळे (864, 144 टक्के, 2755), जळगाव (867, 67 टक्के, 3437), नंदुरबार (347, 50 टक्के, 1822), नाशिक (1517, 66 टक्के, 5991), पुणे (2903, 65 टक्के, 11,188), सातारा (1419, 101 टक्के, 4891), सोलापूर (967. 51 टक्के, 5570), पालघर (1016, 85 टक्के, 2606 ), ठाणे (3904, 95 टक्के, 13,109), रायगड (321, 40 टक्के, 1303).

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content