Details
“तंबाखूला नकार, आरोग्याला होकार!”
01-Jul-2019
”
वैभव मोहन पाटील
[email protected]
आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावेच लागते. त्यामुळे आपण आपल्या वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आपणास विविध आजारांची माहिती तसेच शासनस्तरावरुन या आजारांवर मात करण्यासाठी राबविण्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजना व शासनाच्या विविध योजनांबाबत आपणास पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे.
धूम्रपान तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन ही आज आपल्या समाजातील मोठी समस्या आहे. त्यात शाळा व महाविदयालयीन मुलांमधील तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय आहे. राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पदार्थांच्या विक्री व सेवनावर अनेक निर्बंध आणूनदेखील अनेक ठिकाणी त्यांची विक्री खुलेआम होताना दिसते. तंबाखुच्या सेवनाने नानाविध आजार बळावतात व त्यामुळे मृत्यूदेखील ओढवतात.
तंबाखू सेवनाने जगामध्ये साधारणतः 5 दशलक्षच्या वर लोक विविध आजारांनी मृत्यू पावत आहेत. भारतात हीच संख्या १० लक्ष इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणतः ३६ टक्के पुरुष व ५ टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात व या वापरामुळे ह़दयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुसंकत्व, कमी वजनाचे – व्यंग असलेले – मृत्त्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधीदेखील तंबाखूसेवनाशी निगडीत आहेत. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढलेले आहे.
१३ ते १५ वर्षे वयोगटातील जवळपास 15 टक्के मुलांमध्ये तंबाखुसेवनाच्या प्रमाणाचा आलेख चढता आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशात बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन सर्वाधिक केले जाते. शालेय विदयार्थ्यांमध्ये या व्यसनांचे प्रमाण खूप चिंताजनक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाची माहिती शालेय विदयार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हा भस्मासूर विदयार्थी दशेतच अनेक मुलांमध्ये पसरत जाऊन त्यांच्या शैक्षणिक आयुष्याबरोबरच आरोग्यदायी जीवनदेखील उद्ध्वस्त करेल.
केंद्र शासनाने यापूर्वीच शालेय विदयार्थ्यांसाठी तंबाखू निंयंत्रण कायदा बहुतांशी राज्यांमध्ये सुरू केलेला आहे. यामध्ये शिक्षण संस्थांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जेणेकरुन आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातुन दुष्परिणामांबाबत जनजागृती करता येईल. शाळेपासून महाविदयालयांपर्यांत मुलांचा संबंध येत असल्याने शाळा – महाविदयालये तंबाखू सेवनाच्या नियंत्रणामध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात. लहान वयापासून मुले हया व्यसनांकडे आकर्षित होत असल्याने शाळांच्या माध्यमातून त्यांना व्यसनांपासून परावृत्त केले गेले पाहिजे. यासाठी तंबाखूमुक्त शाळा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे गरजेचे आहे.
व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी केंद्र सरकारने तंबाखू नियंत्रण कायदा २००३ लागू केलेला असून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमदेखील राबविण्यात येत आहे. या कायदयांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूविक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनांवर धोक्याच्या सूचना देणे यांचा अंतर्भाव होतो. या कायदयाचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय संपर्क केंद्रास १८०० ११० ४५६ या क्रमांकावर मोफत संपर्क साधून माहिती देता येते.
लहान मुलांमधील व्यसनांचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिकादेखील अत्यंत महत्त्वाची असून पालकांनी मुलांसमोर व्यसन न करता व्यसनांपासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनूकरण मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होऊन जातात. त्यामुळे व्यसनांपासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैदयकीय मदत घेणे यासाखे उपाय करता येतील. तंबाखू व इतर व्यसनांपासून जनतेला परावृत्त करण्यासाठी शासनस्तरावरुन व्यापक प्रयत्न होत असून व्यसनमुक्तीकडे सुरू असलेल्या वाटचालीस सर्व स्तरातील घटकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
तंबाखूला नकार म्हणजे आरोग्याला होकार
व्यसनांचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार”
“वैभव मोहन पाटील