HomeArchiveउपवासाचा नवा प्रयोग!

उपवासाचा नवा प्रयोग!

Details
उपवासाचा नवा प्रयोग!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
सुटलेल्या पोटाच्या घेराआड कोलेस्टेरॉल पासून ते डायबिटिसपर्यंत अनेक गोष्टी बीपीसह जपणाऱ्यांना, वजन घटवण्याच्या मागे लागलेल्यांना आणि आहारामधून आरोग्य संतुलन शोधणाऱ्यांनाही एक जुनाच उपाय नव्याने शोधून देण्यात आला आहे! “उपाशी राहा आणि आरोग्य कमवा!” असा नवा आरोग्याचा मूलमंत्र काही आधुनिक आहारतज्ज्ञांनी दिला असून जगभरात त्या पद्धतीचे पाठिराखे वाढत आहेत. खरेतर भारतीयांना उपास-तापासाचे काय महत्त्व व ते कोण सांगणार? आपल्याकडे प्रत्येक धर्मात उपवासांचे महात्म्य गायिलेले आहे. लोक जिकडेतिकडे श्रद्धेने त्यांचे पालनही करतच असतात. जैन मंडळी चाळीस-चाळीस दिवस सलग काहीही न खाता-पिता राहत असतात. नवरात्रात नऊही दिवस कडकडीत उपवास करणारेही पुष्कळ असतात. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बराक ओबामांना भेटायला अमेरिकेत गेले, पण खास त्यांच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानीत जेवलेच नाहीत. कारण त्यांचे नवरात्रीचे उपवास सुरू होते.

मुसलमान मंडळी वर्षातून एक महिना दिवसभराचा कडकडीत निर्जळी उपवास करतच असतात. संकष्टीचा महिन्यातून एकदा येणारा उपवास असो वा दर सोमवारी, मंगळवारी दिवसभराचा धरलेला उपवास असो, आपल्याला उपवास करा असे कोणा आहारतज्ज्ञांनी वगैरे सांगण्याची गरजच नाही. अर्थात उपवासाचे पदार्थ मुळीच खाऊ नका असे मात्र नक्कीच सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण साबुदाणा आणि शेंगदाणे यांचा भरपूर मारा केलेले आपले उपवासाचे पदार्थ हे अनारोग्यकारकच आहेत यावर अगदी दीक्षित व दिवेकरांचेही एकमत आहे. दरम्यान या दोन पंथांनी सध्या वजन कमी करणाऱ्यांच्या मनात युद्धच आरंभलेले असते. किती खावे व किती खाऊ नये याचे या दोन्ही पंथांतील ठोकताळे अगदीच भिन्न भिन्न आहेत. दिवेकरांचे बरोबर आहे की दीक्षितांचे बरोबर आहे यावर आपल्या मऱ्हाटी प्रांतवादही रंगलेले आहेत. एकाने छान विडंबनात्मक स्वगत त्यावर रचले आहे. युट्यूब आणि फेसबुकवर त्यानेही मध्यंतरी धुमाकूळच घातला होता.

एक पद्धती आहे ऋजुता दिवेकर यांची तर दुसरी आहे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची. दिवेकरांनी महाराष्ट्राला सांगितले की आहारावर नियंत्रण ठेवताना दर दोन तासांनी थोडेतरी काहीतरी पोटात गेले पाहिजे तर तुमचे वजन नियंत्रणात राहते. पोटांचे घेरही कमी होतात. एकंदरीत तब्ब्येत चांगली राहते. शेवटी प्रत्येक आरोग्य योजनेचा उद्द्येश माणसाचे जीवन सुसह्य व्हावे, निरामय व्हावे हाच असतो. आजारपणाचा आयुष्यातील प्रवेश माणसाच्या पोटातूनच होतो. पोटातून याचाच अर्थ आहारामधून उद्वभवणारे विकार आणि आजारपण. दिवेकरांनी त्यावर मात करण्यासाठी दर दोन तासांनी थोडे खावे ही पद्धती सांगितली तर जगन्नाथ दीक्षितांनी फक्त दोनच वेळा खावे. काहीही खा, पण जेवण पंचावन्न मिनिटांतच संपवा व दोन जेवणांच्या मध्ये काहीही इतर घेऊ नका ही थिअरी मांडली.

डॉ. दीक्षितांनी ही पद्धती उचलली ती डॉ. श्रीकांत जिचकार या अवलिया, अभ्यासू माणसापासून. एक राकारणी नेता इतकीच त्यांची ओळख सांगणे हा डॉ. जिचकरांवरचा अन्याय ठरेल. ते प्रचंड विद्वान होते आणि फार कर्तृत्व प्रकट करण्याच्या आधीच अपघातात दगावले. त्यांनी १९९७ मध्ये आहाराबाबतीत क्रांतीकारी विचार महाराष्ट्राला दिला. “शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे.” स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अँजिओग्राफी आदि.. यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, “दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका.” बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्यानंतर तो मूलमंत्र तसाच राहिला.

डॉ जगन्नाथ दीक्षितांना ती पद्धती भावली व त्यांनी आधुनिक संपर्कसाधनांच्या सहाय्याने त्या विचाराचा मोठा प्रचार केला. डॉ. दीक्षित गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. “स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध” या विषयावर त्यांनी संशोधन केले. यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाईकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. नंतर ती पद्धती त्यंनी जनतेत लोकप्रियही केली. व्हाटस्अप ग्रूपच्या माध्यमांतून आपल्या संकल्पनेचा ते मोठा प्रचार करत आहेत. ऋजुता दिवेकर या आहारतज्ज्ञ म्हणून ख्यातकीर्त तर आहेतच पण त्यांची इंग्रजी व नंतर मराठीत भाषांतरित झालेली पुस्तके प्रचंड खपाचे उच्चांक गाठत आहेत. दिवेकरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या सेलेब्रिटींच्या सल्लागार आहेत. करीना कपूर, सैफ अली खान आणि अनिल अंबानी अशी मंडळी त्यांच्या सल्ल्याने आहार घेतात तेव्हा त्यांच्या ज्ञानाची ती पावतीच असते. दिवेकरांनी सांगितलेल्या अन्यही काही गोष्टी महाराष्ट्राला पटलेल्या आहेत. परदेशी फळे व भाज्या व परदेशी धाटणीचे अन्नपदार्थ, पिझ्झा, बर्गर यापेक्षा उपमा, पोहे, थालीपीठ असे आईने शिकवलेले पदार्थ आहारात घ्यावेत. मुले जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा त्यांना सरळ पोळीभाजीसारखे जेवण द्यावे. सटरफटर खाऊ देऊ नये असा त्यांचा सल्लाही मोलाचा आहे.

दीक्षित आणि दिवेकरांच्या आहारपद्धतींना छेद दणारी तिसरी एक आहाराची पद्धती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली आहे. विख्यात अभिनेते अक्षय कुमार यांना जी मुलाखत मोदींनी दिली, त्यात सकाळी सात वाजता भरपूर न्याहरी, दुपारी बारा वाजता थोडे भोजन आणि सायंकाळी पाच वाजता रात्रीचे पचायला हलके असे जेवण घ्यावे असे सुचवले आहे. जुन्या काळी ग्रामीण भागात अशीच आहाराची पद्धती होती असेही सांगायला ते विसरले नाहीत. त्यामुळे दोन वेळा जेवणे व मध्ये काहीच न खाणे, दर दोन तासांनी थोडे थोडे व घरचे अन्न घेणे आणि आता ही तिसरी पद्धती पुढे आलेली आहे ती तीन वेळा खाणे! आता आणखी एक नवे फॅड सुरू होत आहे. या पद्धतीत सलग 24 वा 48 तास कडकडीत उपवास करा असे सांगितले जाते. सप्ताहातील दोन दिवस असे उपवास करा व नंतर उरलेल्या पाच दिवसात हवे ते भरपेट खा, अशी ही उपवासशास्त्रीय आहारपद्धती सांगते. पण यात साबुदाणावडा हाणायचा नसतो तर हा उपवास पाणी वा लिंबू सरबत इतपतच घेऊन करायचा असतो. या पद्धतीमुळेही वजन पटापट कमी होते व उत्साह वाढतो असा करणाऱ्यांचा दावा आहेच! चला, बघुया कोणती पद्धती तुम्हाला झेपते ती.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content