HomeArchiveसिंधुताई सपकाळ यांना...

सिंधुताई सपकाळ यांना जीवनगौरव! संजय केळकर आदर्श आमदार!

Details
सिंधुताई सपकाळ यांना जीवनगौरव! संजय केळकर आदर्श आमदार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
जागर फाऊंडेशन आयोजित जागर गौरव सोहळ्यात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना यंदाचा जीवनगौरव तर संजय केळकर यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जागर फाऊंडेशनच्या वतीने दर दोन वर्षांनी आयोजित होणारा जागर गौरव सोहळा यंदा रविवार, 6 जानेवारी 2019 रोजी ठाण्यात राम गणेश गडकरी रंगायतन येथे दिमाखात साजरा झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आदर्श लोकप्रतिनिधींनाही उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, सिंधुताई सपकाळ, आ. संजय केळकर, जिल्हा महिला-बाल विकास अधिकारी प्रताप पाटील आणि कुमुदिनी बल्लाळ आणि जागरचे अध्यक्ष सुरेश सोंडकर उपस्थित होते.

सिंधुताई सपकाळ आणि संजय केळकर यांचे कार्य मोठे आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, अशा शब्दात डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ठाण्यातील सहा नगरसेवकांना उत्कृष्ट नगरसेवक म्हणून गौरवण्यात आले. यात मालतीताई पाटील, सुनेश जोशी, सुनिता मुंढे, रागिणी बेरीशेट्टी, सिद्धार्थ ओवळेकर आणि नंदा पाटील यांचा समावेश होता. उत्कृष्ट पत्रकार म्हणून लोकमतचे अजित मांडके, लोकसत्ताचे निलेश पानमंद आणि पुण्यनगरीच्या प्रज्ञा सोपारकर यांना सन्मानित करण्यात आले. याचबरोबर शैलेश पुराणिक आणि संजय पाटील यांना उद्योगगौरव, डॉ. समिरा भारती, अर्चना पाटील, अ‍ॅड. चेतन पाटील यांना समाजगौरव, डी. आर. जाधव यांना क्रीडागौरव, सुनील सिनलकर यांना ज्ञानगौरव, अ‍ॅड. आदेश भगत आणि संदीप पाचंगे यांना जनआंदोलक, डॉ. महेश बेडेकर यांना दक्ष नागरिक, तर अशोक जग्यासी आणि भारतीय मराठा संघाला विशेष सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा कै. कौस्तुभ तारमळे यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात आला. त्यांची आई रत्नप्रभा तारमळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. भातसा नदीत पोहायला गेलेल्या पाच भावंडांना वाचवताना कौस्तुभ तारमळे यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या मृत्यूने शहापूरातच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त झाली होती.

जागर फाऊंडेशनने यंदा ठाणे शहरातील मुंब्रा प्रभाग समितीलाही विशेष पुरस्काराने सन्मानित केले. गेल्या दोन महिन्यांत मुंब्रा भागात बेकायदा फेरीवाले आणि बांधकामे यांच्या विरोधात मोहिमा आखण्यात आल्या. त्यामुळे सध्या नागरिकांना मोकळे रस्ते उपलब्ध झाले आहेत. येथील झालेल्या लोकाभिमूख अमूलाग्र बदलामुळे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर दिव्यातील प्रभाग क्र. 27 ला अस्वच्छ प्रभाग म्हणून घोषित करण्यात आले.

घराकडे दुर्लक्ष करू नये – सिंधुताई सपकाळ

नेते-मंत्री संकटात सुरक्षारक्षक घेऊन फिरतात, पण पत्रकार आणि फोटोग्राफर आपत्तीकाळात कोणतीही सुरक्षाव्यवस्था न घेता जीवावर उदार होऊन बातमीदारी करतो, अशा शब्दात सिंधुताई सपकाळ यांनी जागर गौरव सोहळ्यात पत्रकार दिनाच्या निमित्ताने भावना व्यक्त केल्या. पत्रकारिता करताना पत्रकारांनी घराकडे दुर्लक्ष करू नये. घरच्या लक्ष्मीची आपुलकीने चौकशी करावी, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला.

जंकफूड खाऊ नका – डॉ. तात्याराव लहाने

लोकांची जीवनशैली बदलली आहे. आरोग्याला घातक जंकफूड, तेलकट पदार्थ खाऊ नका. डोळे दिवसातून दोनदा सकाळ-संध्याकाळ पाण्याने स्वच्छ करा. लहान मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका, अशा टिप्स डॉ. लहाने यांनी उपस्थितांना दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक विनोद पितळे, विनोद येतुस्कर, जयश्री रामाणे, डॉ. विणा कावलकर, निशिकांत महांकाळ, शिवाजी कोळी, अमित गुजर, संतोष धुरी आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content