HomeArchiveमनोज कोटक यांचे...

मनोज कोटक यांचे संकल्पपत्र जाहीर

Details
मनोज कोटक यांचे संकल्पपत्र जाहीर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
वाहतूक सुधारणेसह महिला सुरक्षा व सक्षमीकरणावर भर
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी बुधवारी पुढील पाच वर्षांसाठी आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या ‘मन की बात’ जाणून त्यांनी या संकल्पपत्राद्वारे पुढील पाच वर्षांतील आपल्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे मतदारांकडून स्वागत होत असून कोटक यांची त्यांच्या मतदारसंघाप्रती असलेली बांधिलकी या संकल्पपत्राच्या माध्यमातून दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघातील मतदारांच्या गरजा जाणून घेत मनोज कोटक यांनी ४५ आश्वासनांचा समावेश असलेले हे संकल्पपत्र जाहीर केले आहे. मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये हे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण होत असून या आगळ्यावेगळ्या घटनेचे औचित्य साधून आपल्या मतदारांना दिलेले हे आश्वासन असल्याचा उल्लेख संकल्पपत्रात करण्यात आला आहे.

संकल्पपत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे

• मेट्रो ४ – वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
• मेट्रो २ बी – मानखूर्द-बांद्रा-बीकेसी मेट्रो मार्ग कामास गती देणार
• मेट्रो ६ – विक्रोळी-जोगेश्वरी मेट्रो मार्ग कामास गती देणार
• एकात्मिक तिकीट प्रणाली कार्यान्वित करणार
• सर्व लोकल गाड्या पंधरा डब्यांच्या करण्यासोबतच वातानुकूलित लोकलच्या ७८ फेऱ्या सुरू करणार
• ईशान्य मुंबईतील सर्व रेल्वेस्टेशन्सवर लिफ्ट व्यवस्था उभारणार
• कुर्ला टर्मिनसचे आधुनिकीकरण
• मुलुंड-गोरेगाव लिंक रोड तसेच घाटकोपर-अंधेरी लिंक रोडचे काम पूर्ण करणार
• विक्रोळी व विद्याविहार येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणार”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content