HomeArchiveगिरणी कामगारांच्या घरांच्या...

गिरणी कामगारांच्या घरांच्या बेकायदा विक्रीवर होणार कारवाई!

Details
गिरणी कामगारांच्या घरांच्या बेकायदा विक्रीवर होणार कारवाई!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

सभापती मधु चव्हाण घेणार आढावा
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गिरणी कामगारांना म्हाडाने दिलेली घरे मुदतीआधी विकली जात आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण गिरणी कामगारांच्या घरांचे वाटप व योजनांचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.

मुंबईतील गिरणी कामगारांना घरे मिळावीत म्हणून गेली अनेक वर्षे कामगार संघटनांकडून वर्षानुवर्षे आंदोलने आजही सुरू आहेत. त्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याने दीड लाखांहून अधिक कामगारांना घरे देण्यास म्हाडा बांधील आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गिरणी कामगारांचे मोठे योगदान होते. मात्र हेच गिरणी कामगार व त्यांचे वारसदार ही घरे पाच वर्षांच्या मुदतीत न विकण्याची अट मोडून ही घरे विकली जात असल्याचे ही बाब लक्षात आल्याने सभापती मधु चव्हाण यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून कामगारांनी जागा विकू नये म्हणून ते प्रत्यक्ष पुढाकार घेणार आहेत.

गिरणी कामगारांना सात ते नऊ लाख रूपयांत म्हाडाने घरे दिलीत. ही घरे दहा वर्षांत विकू नये अशी त्यांना अट घालण्यात आली होती. परंतु ही अट नंतर शिथिल करून पाच वर्षांपर्यंत आणण्यात आली. त्यानंतर त्यांना बँक कर्जाचे हप्ते देण्यासाठी भाडेकरू ठेवण्यास सवलत देण्यात आली. परंतु काही गिरणी कामगारांननी हीच घरे मुदतीपूर्वी आणि बाजारभावापेक्षा कमी दराने विक्री केल्याचे निदर्शनास आले व तशा तक्रारीही आहेत. याची दाखल घेऊन चव्हाण यांनी घरांची पाहणी करण्याचे ठरविले आहे.
गिरणी कामगारांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन या व्यवहारात दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याकडून कामगारांकडून कमी भावात घरे घेऊन जास्त दरात घरे विकण्यात येत आहेत. या दलाल मंडळीकडून गावी असलेल्या कामगारांना मुंबईत आणले जाते आणि कमी रकमेत ही घरे घेतली जाते. यासाठी हे दलाल या गरीब कामगारांना आगाऊ रक्कम देतात. हा गैरव्यवहार थांबविण्यासाठी गिरणी कामगारांनी आपली हक्काची घरे न विकता मुंबईतच राहवे याकरिता मधु चव्हाण प्रयत्न करणार आहेत.
 
Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content