HomeArchiveकलिना कॅम्पस पुनर्विकासासाठी...

कलिना कॅम्पस पुनर्विकासासाठी 500 कोटींचा निधी द्या – राहुल शेवाळे

Details
कलिना कॅम्पस पुनर्विकासासाठी 500 कोटींचा निधी द्या – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सुमारे 162 वर्षांची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस पुनर्विकासाची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने 500 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.

‘सेंट्रल युनिव्हर्सिटीज बिल 2019’ या विधयेकाच्या चर्चेदरम्यान खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली. तसेच, मुंबई विद्यापीठाच्या अनेक समस्या सोडविण्यासाठीही केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाला 162 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या पुनर्विकासाचा आराखडा राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार किंवा विद्यापीठाकडे इतका निधी उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून कलिना कॅम्पसचा पुनर्विकास रखडला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने 500 कोटींचा निधी या पुनर्विकासासाठी त्वरित उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली.

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांबाबतची समस्याही खासदार शेवाळे यांनी लोकसभेत मांडली. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 86 पदांपैकी 59 पदे रिक्त आहेत तर सहाय्यक प्राध्यापकांच्या 129 पदांपैकी 57 पदे रिक्त आहेत. वास्तविक, विद्यापीठाला उत्पन्न नसल्याने आणि प्राध्यापकांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे लागेल म्हणून ही रिक्त पदे भरली जात नसल्याची माहिती खासदार शेवाळे यांनी सभागृहात मांडली. ही रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी त्यांनी केली. कलिना कॅम्पसमधील डिस्टन्स एज्युकेशन, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विशेष स्पोर्ट्स पदवी अभ्यासक्रम यासाठीचे सरकारच्या विचाराधीन असलेले प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, असेही ते म्हणाले.

मुंबईतून केंद्र सरकारला सुमारे 40 टक्के महसूल जातो, त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई आणि मुंबई विद्यापीठातील समस्या सोडविण्यासाठी निधी द्यावा. गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया आणि पेपर तपासणीत बऱ्याचदा घोळ झाले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या समस्यांना वाचा फोडली, याची आठवण करून देत केंद्र सरकारने मुंबई विद्यापीठाला बळकटी द्यावी, अशी मागणी खासदार शेवाळे केली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content