HomeArchiveनिवडणूक प्रचारात सर्व...

निवडणूक प्रचारात सर्व कार्यकर्त्यांना सहभागी करा – सरोज पांडे

Details
निवडणूक प्रचारात सर्व कार्यकर्त्यांना सहभागी करा – सरोज पांडे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव डॉ. सरोज पांडे आणि राष्ट्रीय संघटनेचे सचिव व्ही. सतीश यांनी सर्व खासदार, आमदार, नगरसेवक आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सहभागी होण्याचे निर्देश रविवारी दिले.

मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी वसंत स्मृतीभवन, दादर येथे प्रथमच रविवारी कार्यकारी समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात एकत्र येण्यासाठी पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

यावेळी बोलताना पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्त्वात भाजपा हा देशातील सर्वात मोठा आणि बलाढ्य पक्ष बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात पक्षाला बळकटी मिळाली आहे. म्हणूनच आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता संपादन करणार आहोत. परंतु प्रत्येक स्तरावर जबाबदारीने काम केल्यानेच ही सत्ता संपादन करणे शक्य होणार आहे.”या बैठकीत पक्षाच्या महासचिव डॉ. सरोज पांडे यांनी खासदार, आमदार, नगरसेवक आणि जिल्हाध्यक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचे लक्ष्य निश्चित करण्याचा सल्ला दिला. राष्ट्रीय संघटनेचे सचिव व्ही. सतीश म्हणाले की, “पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका जिंकून पक्षाला सत्तेत आणण्याचा संकल्प पक्षाने घ्यावा. कार्यकारी समितीच्या बैठकीत नवनियुक्त मंत्री आशिष शेलार आणि योगेश सागर तसेच नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक आणि खासदार गोपाळ शेट्टी यांचे स्वागत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली केले गेले.

यावेळी भाजपचे सदस्यता अभियान, युवा शक्ती अभियान आणि शक्ती सन्मान अभियान कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि या तीन कार्यक्रमांच्या संचालनाचा तपशील जिल्हास्तरावर घेण्यात आला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वानसत १ ऑगस्टपासून सुरू होणारी ‘महा जनादेश’ यात्रा यशस्वी करण्यासाठी बूथस्तरावर संघटना अधिक मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत मुंबईचे सर्व आमदार, नगरसेवक जिल्हाध्यक्ष तसेच मुंबई प्रदेश भाजपा कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना आणि युवा मोर्चाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा आणि सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांना या बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीचे सूत्रसंचालन नगरसेवक सुनील यादव यांनी केले. नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content