HomeArchiveअल्पसंख्याकांसाठीच्या योजना प्रभावीपणे...

अल्पसंख्याकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा – हाजी अरफात शेख

Details
अल्पसंख्याकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा – हाजी अरफात शेख

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. नवी मुंबईतील अल्पसंख्याकबहुल भागात महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी सोमवारी दिले.

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात पंतप्रधानांच्या पंधरा कलमी कार्यक्रमासह केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. नवी मुंबई महापालिकेच्या उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, सभागृह नेते रविंद्र इथापे, क्रीडा व सास्कृतिक कार्यक्रम समिती सभापती मुन्वर पटेल, उद्यान समिती सभापती मीरा पाटील, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अतिरिक्त आयुक्त रविंद्र पाटील व महावीर पेंढारी यांच्यासह गणेश सुरवसे, नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, सरचिटणीस विनय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अल्पसंख्याक आयोगाचे कामकाज ठराविक समाजापुरते मर्यादित न ठेवता अल्पसंख्यांकात मोडणाऱ्या सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. यामध्ये कोणताही घटक उपेक्षित राहता कामा नये. मुस्लिमबहुल समाजाच्या कब्रस्तानातील अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, पथदिवे, पाणी आदी मुलभूत सुविधांबाबत संवेदनशील राहून कामे होणे अपेक्षित आहे. अल्पसंख्याक संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रलंबित प्रस्ताव तातडीने निर्गमित करावेत असेही शेख यांनी सूचित केले.
 
बैठकीदरम्यान अल हसनाद उर्दू शाळेच्या जागेच्या समस्येमुळे निर्माण झालेली ३०० मुलांची शैक्षणिक अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने सर्वतोपरी सहकार्य करावे असे त्यांनी सूचित केले. शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न होणे अपेक्षित आहे असे सांगत या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी शाळेला भेटदेखील दिली.
 
यावेळी आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी अल्पसख्यांक समाजासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला. पोलिस प्रशासनासह कौशल्य विकास कार्यक्रम राबविणाऱ्या यंत्रणेने पंधरा कलमी कार्यक्रमातील अनास्था दूर करून अल्पसंख्यांकांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पंतप्रधान मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजासाठी सकारात्मक असून त्यांच्यासाठी विविध योजना राबवित असतात. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत असलेल्या अटी शिथील करण्यात आल्या असून या योजनेविषयी सखोल माहिती घेऊन एम.एस.डी.पी. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महानगरपालिकेमार्फत राज्य सरकारला सादर केलेल्या विविध प्रस्तावांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content