HomeArchiveपूरबाधित कुटुंबियांच्या घरी...

पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!

Details
पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!

    29-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 
 

 
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com
 
कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या महापुरात अनेकांचे छत्र हरवले. अनेक लघुद्योगही विस्कळीत झाले. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच स्थानिक कुंभार समाजाने बनविलेल्या सर्वच्या सर्व गणेशमूर्ती पुरात वाहून गेल्या. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा कसा करावा, हा प्रश्न जिल्ह्यातील गणेशभक्तांसमोर निर्माण झाला होता. 
 
दरम्यान, महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तसेच कुंभार समाजाने आपली व्यथा मांडली. देवावरील श्रद्धा आणि जनभावनेची दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक कुंभार समाजबांधवांच्या माध्यमातून या मूर्तींचे वितरण करण्यात येणार आहे.
 
कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे कुरूंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांचे गणेशमूर्तींचे मोठे नुकसान झाले होते. कुरूंदवाड शहरात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम, असा मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक अत्यंत सलोख्याने दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात. मात्र, यावर्षी कोल्हापुरात महापूर आल्याने येथील कुंभार समाजातील बांधवानी बनवलेल्या गणेश मूर्ती पाण्यात वाहून गेल्या. कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री पाटील पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कुरूंदवाड येथील कुंभार समाजबांधवांची समस्या जाणून या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती पेण येथून कुरूंदवाड येथे आणण्यात आल्या आहेत.”

 
 
 

 
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com
 
“कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या महापुरात अनेकांचे छत्र हरवले. अनेक लघुद्योगही विस्कळीत झाले. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच स्थानिक कुंभार समाजाने बनविलेल्या सर्वच्या सर्व गणेशमूर्ती पुरात वाहून गेल्या. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा कसा करावा, हा प्रश्न जिल्ह्यातील गणेशभक्तांसमोर निर्माण झाला होता. ”
 

“दरम्यान, महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तसेच कुंभार समाजाने आपली व्यथा मांडली. देवावरील श्रद्धा आणि जनभावनेची दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक कुंभार समाजबांधवांच्या माध्यमातून या मूर्तींचे वितरण करण्यात येणार आहे.”

 
“कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे कुरूंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांचे गणेशमूर्तींचे मोठे नुकसान झाले होते. कुरूंदवाड शहरात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम, असा मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक अत्यंत सलोख्याने दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात. मात्र, यावर्षी कोल्हापुरात महापूर आल्याने येथील कुंभार समाजातील बांधवानी बनवलेल्या गणेश मूर्ती पाण्यात वाहून गेल्या. कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री पाटील पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कुरूंदवाड येथील कुंभार समाजबांधवांची समस्या जाणून या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती पेण येथून कुरूंदवाड येथे आणण्यात आल्या आहेत.”

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content