Details
दसऱ्यानिमित्त भातखळकर यांनी लुटले जनसंपर्काचे सोने
09-Oct-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतल्या कांदिवली पूर्व भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सुट्टीचा पुरेपूर लाभ उठवत जोरदार जनसंपर्क केला. मालाड पूर्व आणि कांदिवली पूर्व इथल्या अनेक वस्त्यांत त्यांनी मतदारांची गाठभेट घेतली. ठिकठिकाणी लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
दसऱ्यानिमित्त आज असलेल्या सुट्टीमुळे मतदार मोठ्या संख्येने घरी असल्याचा फायदा घेत पदयात्रा आणि रथयात्रेच्या मध्यमातून भातखळकर सकाळपासून मतदारसंघात फिरत होते. मालाड पूर्व येथे सकाळी ठीक ९ वाजता वडारी पाडा, निवेटिया रोड येथून प्रचाराला सुरूवात झाली. या वस्तीत कनिष्ठ मध्यमवर्गीय मतदारांची संख्या खूप मोठी आहे. भातखळकरांनी पदयात्रेच्या माध्यमातून गल्लीबोळात जाऊन मतदारांची भेट घेतली. गेल्या ५ वर्षांत या भागात सतत ठेवलेला संपर्क आणि त्यांनी केलेली जनसुविधांची कामे यामुळे त्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. विशेषतः महिलांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक ठिकाणी वृद्ध महिलांना भातखळकर वाकून नमस्कार होते. त्यांनी भातखळकरांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
पदयात्रा संपल्यानंतर त्यांनी स्वामी नारायण पंथीय संतांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.सायंकाळी ५ वाजल्यापासून बाणडोंगरी ते अशोकनगर असा निवडणूकरथावरून प्रवास करत जनसंपर्क केला. गेल्या ५ वर्षांत केलेली कामे, संघटनेची उत्तम बांधणी आणि शिवसेना-आरपीआय-रासप या मित्रपक्षांच्या मजबूत पाठबळामुळे त्यांच्यासोबत सदोदित कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था असतो. कांदिवली पूर्व मतदारसंघात इतर कोणत्याही उमेदवाराकडे ना एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जत्था आहे, ना जनतेचा पाठिंबा! अतुल भातखळकर यांनी सुनियोजित प्रचाराच्या माध्यमातून मतदारसंघात चांगले वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे तूर्तास तरी ही लढत पूर्णपणे एकतर्फी दिसत आहे, अशी चर्चा या मतदारसंघात आहे.
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतल्या कांदिवली पूर्व भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सुट्टीचा पुरेपूर लाभ उठवत जोरदार जनसंपर्क केला. मालाड पूर्व आणि कांदिवली पूर्व इथल्या अनेक वस्त्यांत त्यांनी मतदारांची गाठभेट घेतली. ठिकठिकाणी लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
“दसऱ्यानिमित्त आज असलेल्या सुट्टीमुळे मतदार मोठ्या संख्येने घरी असल्याचा फायदा घेत पदयात्रा आणि रथयात्रेच्या मध्यमातून भातखळकर सकाळपासून मतदारसंघात फिरत होते. मालाड पूर्व येथे सकाळी ठीक ९ वाजता वडारी पाडा, निवेटिया रोड येथून प्रचाराला सुरूवात झाली. या वस्तीत कनिष्ठ मध्यमवर्गीय मतदारांची संख्या खूप मोठी आहे. भातखळकरांनी पदयात्रेच्या माध्यमातून गल्लीबोळात जाऊन मतदारांची भेट घेतली. गेल्या ५ वर्षांत या भागात सतत ठेवलेला संपर्क आणि त्यांनी केलेली जनसुविधांची कामे यामुळे त्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. विशेषतः महिलांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक ठिकाणी वृद्ध महिलांना भातखळकर वाकून नमस्कार होते. त्यांनी भातखळकरांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.”
“पदयात्रा संपल्यानंतर त्यांनी स्वामी नारायण पंथीय संतांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.सायंकाळी ५ वाजल्यापासून बाणडोंगरी ते अशोकनगर असा निवडणूकरथावरून प्रवास करत जनसंपर्क केला. गेल्या ५ वर्षांत केलेली कामे, संघटनेची उत्तम बांधणी आणि शिवसेना-आरपीआय-रासप या मित्रपक्षांच्या मजबूत पाठबळामुळे त्यांच्यासोबत सदोदित कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था असतो. कांदिवली पूर्व मतदारसंघात इतर कोणत्याही उमेदवाराकडे ना एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जत्था आहे, ना जनतेचा पाठिंबा! अतुल भातखळकर यांनी सुनियोजित प्रचाराच्या माध्यमातून मतदारसंघात चांगले वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे तूर्तास तरी ही लढत पूर्णपणे एकतर्फी दिसत आहे, अशी चर्चा या मतदारसंघात आहे.”
कांदिवली पूर्व भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीअतुल भातखळकर यांनी विजयादशमीमतदारसंघपदयात्रा