HomeArchiveआधुनिकतेने हिरावले आमचे...

आधुनिकतेने हिरावले आमचे संस्कार – अभिनेते शैलेश लोढा

Details
आधुनिकतेने हिरावले आमचे संस्कार – अभिनेते शैलेश लोढा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
माणसांनी तांत्रिकरीत्या प्रगती केली, ही बाब खरी.. पण, त्याचसोबत या प्रगतीतील आधुनिकतेने आपल्यातील संस्कार हिरावले आहेत, असे मत लोकप्रिय टिव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम, सुप्रसिद्ध अभिनेते व ज्येष्ठ हिंदी कवी शैलेश लोढा यांनी व्यक्त केले.

‘मारवाड़ीज इन थाने वेलफेअर’ या संस्थेच्या वतीने ठाणे (प.) येथील गडकरी रंगायतन येथे प्रवासी राजस्थानी समाजास एका व्यासपीठावर आणण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘राजस्थान महोत्सव-२०१९’ सोहळ्यात ते बोलत होते.

संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा व महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीस सुमन आर. अग्रवाल यांच्या संयोजनाखाली पार पडलेल्या या भव्य सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी चुरू (राजस्थान) येथील नवनिर्वाचित आमदार व आंतरराष्ट्रीय एथलीट पद्मश्री कृष्णा पुनिया आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस बी. एम. संदीप प्रमुख पाहुणे म्हणून तर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे, उल्हासनगर काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला विशेष पाहुणे होते.

सोहळ्याची सुरूवात पारंपरिक शैलीतील गणेश वंदनेच्या समूहनृत्याने झाली. सदर सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवी-उद्योगपती सत्यनारायण बजाज यांना संस्थेच्या वतीने या वर्षाचे प्रतिष्ठित ‘मारवाड़ रत्न’ व अनिता टिबरेवाल यांना ‘महिला उद्योगरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योगपती-समाजसेवक दीनदयाल मुरारका, रमाकांत परसरामपुरिया, एस. एल. पोखरणा, राधेश्याम अग्रवाल, अमर ठाकुर, एल. व्ही. राठी, विक्रम जैन, संदीप गर्ग, डॉ. राजेंद्र अग्रवाल, शिवकांत खेतान, महेश बंसीधर अग्रवाल, विकास केडिया, सुरेंद्र रूइया, ब्रिज मित्तल, उत्तम जैन, सुरेश राठोड, चंचल झंवर, अभिनेत्री गरिमा जैन, सीमा नैयर, प्रजापिता ब्रह्मकुमारी समाजच्या लतिका दिदी आणि टाइम्स एंड ट्रेंड्स एकेडमीच्या संचालिका निकीता अग्रवाल, विरेंद्र पुनिया आदी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content