Details
रामायणावर चर्चा..
01-Jul-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव मुंबईत फेब्रुवारीच्या २५ तारखेला आयोजित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरियाणा राज्यात एका कार्यक्रमात केली होती. अयोध्येत राममंदिर उभारा अन्यथा सत्तेवरून खाली उतरा.. असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिल्यानंतर देवेंद्रभौची झोपच उडाली. बाळासाहेबांचं स्मारक बांधण्यासाठी सगळे नियम शिथिल करूनही उद्धवजी काही गप्प बसत नाही. त्यांनी एक शक्कल लढवली. भाजपा रामभक्त आहे, हे येत्या निवडणुकीपूर्वी लोकांना दाखविण्यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव भरविण्याचे ठरले. ऐन रामायण महोत्सवात गोंधळ होऊ नये म्हणून सेना-भाजपा मंत्र्याची एकत्र बैठक बोलावली. कधी वेळेवर न येणारे सगळे मंत्री रामायण घडविण्यासाठी वेळेवर येऊन बसले. प्रथम रामायण नाटक आपल्यात कसं बसवायचं याकरिता मुख्यमंत्र्यानी सुरूवात करावी, अशी सूचना दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्याना केली. ही सूचना ऐकताच सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले.
मुख्यमंत्री: रामाची भूमिका कोण करणार, सांगा पाहू? (सगळे मंत्री एकमेकांकडे पाहतात.. पण तयार कोणीही होत नाही)
सुभाष देसाई: देवेंद्रजी, तुम्हीच व्हाss..! तुम्ही हॅन्डसम आहात आणि तुम्हाला जाहिरात क्षेत्रात मॉडेलिंग म्हणून काम केल्याचा अनुभव आहे.
देवेंद्रजी: बरं आहे तुमचं, श्रीरामाची भूमिका मला करायला लावता म्हणजे मला वनवासात पाठविण्याची तुमची तयारी दिसते?
गिरीश महाजन: वनवासावरून आठवलं, साहेब..
सुधीरभाऊ: वनमंत्री मी आणि वनवास काय असतो ते मला ठाऊक आहे..
महाजन: वन विभाग तुमच्याकडे असले तरी तुम्ही २४तास एसीमध्ये असतात.. (सगळेजण हसतात.. मुख्यमंत्रीही तोंडावर हात ठेवून हसत असतात.. सुधीरभाऊही त्यात सामील होतात..)
सुधीरभाऊ: गिरीशजी सुचवा कोणाचे ते नाव?
महाजन: माझ्यासमोर एकाच नांव आहे, नाथाभाऊंचं! मंत्रिमंडळातून त्यांना काढून ते आज वनवास भोगत आहेत.. मी म्हणतोय तेच रामाची भूमिका चांगली करू शकतात..
गिरीश बापट: मग तुम्ही हनुमानाची भूमिका करा, नाही तरी तुम्ही देवेंद्र यांचे हनुमान म्हणून ओळखले जातात.. (पुन्हा सगळे कोरसमध्ये हसतात.. विद्या ठाकूर बाई तर खुर्चीसहित पडणार होत्या. पण सेनेचे सुभाष देसाई यांनी त्यांना सावरलं..)
मुख्यमंत्री: बघा विद्याबाईंनी देसाईंना निवडणुकीत पाडलं. पण मनात काही वैरभावना न ठेवता त्यांना सावरलं.. याला म्हणतात..
रामदासभाई: आम्ही भाई असलो तरी स्त्रियांचा आदर करणे आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे..
मुख्यमंत्री: सीतेची भूमिका कोण करणार?
रावते: आपण ही भूमिका पंकजाताईना देऊया! त्या नेहमी रावणाच्या लंकेत केस सोडून बसलेल्या सीतामाईसारख्या कायमच्या केस सोडलेल्या स्थितीत असतात, त्यामुळे..
चंद्रकांतदादा: नको, नको.. सीतेमधल्या सात्त्विकतेची भूमिका त्यांना जमणार नाही. कोणताही संवाद त्यांना दिला तर त्या शेवटी बोलणारच “मी लोकांच्या मनातील सीएम आहे”, त्यामुळे त्या डायलॉगवर टाळ्या पडतील आणि माझे सीएम पद जाईल. (सगळेजण पुन्हा हसतात, पंकजाताई टेबलावर डोकं ठेवून खुदू खुदू एवढं हसतात की संपूर्ण टेबल भूकंप झाल्यासारखे हलत होते.)
मुख्यमंत्री: लक्ष्मणच्या भूमिकेचे काय? (सिएमनी पुढच्या वादाला फोडणी दिली..)
सुधीरभाऊ: आपले यांना करू या (दीपक केसरकर यांच्याकडे बोट दाखवीत..) दीपकभाऊ शांत स्वभावाचे आहेत तसेच आज्ञाधारकही आहेत..
गुलाबराव पाटील: नको.. ते प्रामाणिक आहेत, आज्ञाधारक आहेत नो दाऊट, पण त्यांना धनुष्यबाण सावरता येईल का?
पंकजाताई: का नाही?
गुलाबराव: ते ओरिजिनल शिवसैनिक नाहीत, त्यामुळे त्यांना धनुष्यबाण खांद्यावर ठेवण्याचा सराव नाही..
चंद्रकांतदादा: अहो, गुलाबराव तुम्ही लक्ष्मण आणि नाथाभाऊ राम मग काय? राम-रावणाचं युद्ध होण्याच्या ऐवजी राम-लक्ष्मण युद्ध लोकांना पहावे लागेल (सर्व एकाचवेळी हसल्याने हास्यस्फोट होतो)
मुख्यमंत्री: हे पाहा, रामायण महोत्सव आपल्याकडून काही होणार नाही. आपण कोणीही कलाकार म्हणून काम करायची गरज नाही. आपण हे बाहेरच्या नाटक कंपनीला देऊया.. आता हा जो आपल्यात विनोद झाला, त्याबाबत कोणीही पत्रकाराला बातमी देऊ नये. (सर्वजण हसत हसत हो म्हणत बाहेर पडतात.)”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार