HomeArchiveरिक्षात उर्मिला मातोंडकर!

रिक्षात उर्मिला मातोंडकर!

Details
रिक्षात उर्मिला मातोंडकर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
(रंगीलाफेम उर्मिला मातोंडकर आमच्या बंड्याला भेटली, तीही रिक्षात.. विश्वास बसत नाही ना? पण सत्य आहे. तिला ‘चंदेरी’ पडद्यावर पाहत होता तो आणि उगाच तो मनातल्या मनात तिच्याविषयी ‘चित्र’पट रंगवत असे तरूणपणी. उर्मिला आपल्याला कधी भेटेल का? आपण तिच्याशी बोलू का? अशाप्रकारे मनात काहीतरी विचार तरूण असताना येत होते. बोरीवलीला मित्राकडे चालला होता तो, रिक्षातून.. त्याच्या रिक्षात साक्षात उर्मिला मातोंडकर बसली.. दोघांत भरउन्हात ‘गार’ संवाद झाला..)

उर्मिला: नमस्कार भाऊ.. (भाऊ म्हणताच बंड्या चांगलाच घामाघूम झाला.. तिच्याविषयी ऐन तारूण्यात काय काय स्वप्न रंगवली, ती रंगीला बंड्याला चक्क भाऊ म्हणाली.. मनातल्या मनात तो रागावला. पण, उर्मिलासाठी त्याने तो राग हळुवार गिळला..)
बंड्या: उर्मिला मातोंडकर, तू आणि रिक्षात. कमाल आहे. तू निवडणुकीला उभी आहेस, पण माझ्या रिक्षात माझ्याबरोबर बसशील असं स्वप्नातही वाटलं नाही. आणि हे बघ तू सर्वांची लाडकी आहेस, तू मला भाऊ हाक मारू नकोस.. महाराष्ट्रात एकच भाऊ आहे तो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’मधला भाऊ कदम.. समजलं?
उर्मिला: हे बघ, नाव काय तुझं? (असं म्हणताच बंड्याला अंगावर मोरपीस फिरविल्यासारखे वाटले.. रिक्षात असूनही मर्सिडीजमध्ये असल्यासारखे वाटले..)
बंड्या: माझं नाव बंड्या..
उर्मिला: शीssss इश्शsss तू मराठी आहेस ना? तुला संपूर्ण नाव घ्यायला लाज वाटते का? मी बघ, माझं नाव उर्मिला असून मी चित्रपटात उर्मिला मातोंडकर असेच लावले.. सुरूवातीला ते हिंदीभाषिक मातोंडकरऐवजी मारतोडकर बोलायचे.. त्यांना मातोंडकर बोलायची सक्ती केली की नाही मी!
बंड्या: माझं नाव बंड्या मारोतकर.. (बंड्याने कसेबसे तिच्याशी जुळेल असे आडनाव सांगितले)

उर्मिला: अरे व्वाsss आपल्या नावातही किती साम्य आहे ना? बरं, सांग मी लोकसभेसाठी उभी आहे याचा तुला अभिमान वाटत असेल.. हो की नाही? (लाडात, लाडात येऊन उर्मिलेने बंड्याला बोलण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला)
बंड्या: हो मला तुझा अभिमान वाटतो.. (एव्हढ्यात स्पीडब्रेकर आल्याने ती बंड्याच्याजवळ येते.. आणि बंड्याला काहीच सुचेना.. तो एका वेगळ्या विश्वात रमतो..)
उर्मिला: बंड्या तू बोलत नाहीस, तुला काय झालं? (बिस्लरीची बाटली त्याच्या तोंडाजवळ धरत) हे घे पाणी..
बंड्या: थँक्स..
उर्मिला: तू लोकसभेत मला पाठवणार ना?
बंड्या: हो तुलाच देणार माझं मत.. त्या गोपाळ शेट्टीची बघ कशी शिट्टी वाजवतो? दक्षिणेतून आला, झोपडपट्टीत राहिला आणि शिक्षण किती तर फक्त सातवी. आम्ही डबल ग्रॅज्युएट होऊन अजून रिक्षातूनच प्रवास करतोय..
उर्मिला: हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, बंड्या.. हे बघ मला सांग तुझ्या महत्त्वाच्या समस्या कोणत्या आहेत?
बंड्या: आमच्या समस्या काय सांगू तुला.. (बंड्याचा घसा कोरडा झाल्याने उर्मिलाने पुन्हा त्याच्यासमोर पाण्याची बाटली धरली.. बंड्याने बोलण्याच्या नादात बाटली तोंडाला लावली)
उर्मिला: असू दे, असू दे..
बंड्या: बघ, तू पाणी दिलंस आणि पाण्याची आठवण झाली.. आमच्या सोसायटीत सकाळी आणि संध्याकाळी पाणी येते आणि त्याला काही फोर्स नसतो..
उर्मिला: आलं लक्षात.. तुमच्याकडे पाणी कमी येतं..
बंड्या: आणि हे रस्त्यावरील खड्डे, यामुळे संध्याकाळी घरी गेल्यावर पाठ दुखते.. हे रस्ते चांगले करण्यासाठी तू लक्ष दे..
उर्मिला: आणखी महत्त्वाचा कोणता प्रोब्लेम?
बंड्या: उर्मिला, तू कधी ट्रेनने प्रवास केलास का?
उर्मिला: हो, गोरेगाव ते दादर असा प्रवास करत कॉलेजला जात होती.. रेल्वे डब्यातून बाहेर पडताना कित्येकवेळा स्टेशनवर पुस्तके पडायची माझी..
बंड्या: तुझी पुस्तके पडायची, अगं गर्दीमुळे आम्हाला स्टेशनवर उतरता येत नाही..
उर्मिला: फार वाईटच परिस्थिती.. मी निवडून आल्यावर रेल्वेमंत्र्याकडे हा प्रश्न धसास लावीन..
आणखी कोणती समस्या?
बंड्या: हो तुला सांगायला विसरलो. त्या अदानीने वीज कंपनी हातात घेतल्यापासून आम्हा ग्राहकांना तो दर महिन्याला शॉक देतोय.. (हे ऐकून उर्मिलेने बंड्याच्या खांद्यावर हात ठेवला.. बंड्याला शरीरात वीजप्रवाह गेल्याचा भास झाला..) आणि हो.. भाज्या महाग होत चालल्या आहेत. रोज बायकोचं नाही, नाही ते ऐकावं लागतं..
उर्मिला: काय तुमच्या समस्या रे बंड्या.. अक्षरशः हा वनवास आहे..
बंड्या: वनवास नाही तर काय? आता सेना-भाजपवाले राममंदिर उभारणार आहेत..
उर्मिला: तुझी काही हरकत आहे का?
बंड्या: हरकत नाही, पण राममंदिर उभारून हेच सेना-भाजपवाले आम्हाला शहाणपणा शिकवतील..
उर्मिला: ते कसं काय?
बंड्या: राम हा आपल्या सर्वांचा आदर्श आहे.. महात्मा गांधींना ‘रामराज्य’ आणायचं होते ते स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे भाजप म्हणेल..
उर्मिला: बोलू दे त्यांना.. नुसतं बोलणं हेच भाजपचे काम आहे..
बंड्या: अगं, उर्मिले तुला कसं कळत नाही? (बंड्या बायकोला बोलतो त्या थाटात बोलतो तसा उर्मिलावर खेकसतो..) हे भाजपवाले भाषणात बोलतील, महागाईचा हा वनवास भोगताना श्रीराम प्रभूचा आदर्श सर्वांनी ठेवावा. रामाने जो १४ वर्षे वनवास भोगला तोच आदर्श ठेवून आज महागाई, रेल्वे प्रवास, खड्ड्यातून प्रवासाचा वनवास भोगू या..
(उर्मिलेने बंड्याच्या हातातील पाण्याची बाटली घेऊन तोंडाला लावली.. बंड्या तिच्या तोंडाकडे बघत राहिला.. सामान्य माणसाशी एकरूप होणारी उर्मिला त्याला प्रथमच दिसली.. त्याला रंगीला उर्मिला हा एक चित्रपटाचा भाग होता.. प्रत्यक्षातली उर्मिला ही आपली वाटत होती)
उर्मिला: बंड्या, चल मी उतरते.. मला बऱ्याच लोकांना भेटायचे आहे..
बंड्या: हे बघ उर्मिला, निवडून आल्यावर आम्हाला विसरू नकोस..
उर्मिला: नाही रे बंड्या.. (उर्मिलेने बंड्याच्या केसांवरून हात फिरवत रिक्षातून उतरली..)
बंड्या: (रिक्षावाल्याला सांगतो.. सिग्नलजवळ रिक्षा उभी कर..) किती झालेत?
रिक्षावाला: ५० रूपये.. साहेब तुम्ही खुश झाला असाल.. हो ना?
बंड्या: एवढी मोठी अभिनेत्री, रिक्षात बसते काय? ओळख असल्यासारखी बोलते काय? सर्व कसं अनपेक्षितच!
रिक्षावाला: (५० रूपये घेऊन..) बंड्याभाऊ, ती उर्मिला मातोंडकर नव्हती तर तिची डमी होती.. (असं म्हणत तो तिथून सटकला..)”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content