HomeArchiveआंबेडकरी चळवळीचे ‘पानीपत’!

आंबेडकरी चळवळीचे ‘पानीपत’!

Details
आंबेडकरी चळवळीचे ‘पानीपत’!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

भगवान निळे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
दलित चळवळीला एवढा क्रान्तिकारी वारसा असताना नवीन दलित नेतृत्त्व उदयाला येताना दिसत नाही. आंबेडकरी चळवळीतून नवे नेतृत्त्व उभे का राहत नाही, हा प्रश्न आजही कायम आहे. वर्तमान दलित चळवळ मोठ्या अरिष्टात सापडली आहे. त्यामुळे दलित चळवळ संपली आहे का, हे तपासणे क्रमप्राप्त झाले आहे. जगातील कुठलीही सामाजिक चळवळ कायम गतिमान राहू शकत नाही. सामाजिक चळवळीत चढउतार असतात. चळवळीचे संदर्भ, प्रश्न आणि नेतृत्त्व बदलत राहते, म्हणून चळवळही बदलत राहते. दलित चळवळ दिशाहीन झाली हे वादातीत आहे. पण, याचे खापर फक्त नेत्यांवर फोडून कसे चालेल? याला चळवळीसाठीचे सर्व घटक जबाबदार असतात. अलीकडे लोक दलित चळवळीत सहभागी होत नाहीत. लोक काही उद्द्येशांमुळे चळवळीत सहभागी होतात. चळवळीतील सहभाग्यांना वर्तमान परिस्थितीमध्ये बदल घडवून आणायचा असतो. तसेच, कुठल्यातरी समुदायाचा, गटाचा सभासद असावे असे लोकांना वाटते. लोकांच्या मनात स्वत:च्या जीवनाला वेगळा अर्थ व संदर्भ मिळवून देण्याची तीव्र ‘इच्छा असते. चळवळीतील सहभाग्यांना आपली वेगळी अस्मिता निर्माण करायची असते. सामाजिक चळवळीतील सहभागाविषयी वरील प्रकारचे निकष दलित चळवळीला लावून पाहिले तर आजची दलित चळवळ दिशाहीन का झाली, याची उत्तरे सापडू शकतात.

दलितांच्या शारीरिक स्तरीकरणात आपण काय केले? बाबा आढावांची ‘एक गाव एक पाणवठा’ ही पाण्यासंदर्भातील तर ‘झुणका भाकर एक रूपयात’ अशा अन्नासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या योजना दलित संघटनांनी गावागावात का नेल्या नाहीत? राखीव जागांचा लाभ घेऊन जे दलित डॉक्टर्स तयार झाले, त्यातले किती जण दलित वस्त्यांत गेले? दलितांनी किती इस्पितळे उघडली? दलितांनी एकत्र येऊन बांधकाम करून इस्पितळाची इमारत बांधणे अशक्य नव्हते. ते आम्ही का केले नाही? दलित वृद्धाश्रम का उभारले गेले नाहीत? जर बाबा आढाव सवर्णमान्य नव्हते, तर अशी समांतर योजना दलितांनी गावागावात का उभारली नाही? सरकारकडून मदत घेऊन झुणका भाकरसारखी अन्नकेंद्रे उभारणे का झाले नाही? बाबासाहेबांच्या जयंतीसाठी पैसे जमतात आणि ह्या कामासाठी पैसे जमत नाहीत? आम्ही दारूबंदी चळवळ का उभी करत नाही? दलितांच्यात व्यसनांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यासाठी किती व्यसनमुक्ती केंद्रे दलितांनी उभी केली? असे प्रश्न सर्व दलितांनी स्वतःला विचारायला हवेत.

क्रीडा क्षेत्र हे एक दलितांना स्वतःला सिध्द करण्याचे चांगले क्षेत्र होते. आम्ही ह्या क्षेत्राकडे किती लक्ष दिले? दलित नेत्यांना साधा एक कबड्डीचा किंवा खो-खोचा संघ तयार करावासा वाटला नाही? आदिवासींच्यात आलेल्या क्रीडाक्षमतेबाबत आम्ही काय केले? अमेरिकेतल्या निग्रोंची प्रतिष्ठा वाढवण्यात तिथल्या कृष्णवर्णीय क्रीडापटूंचा मोठा वाटा आहे हे आम्ही कधी लक्षात घेणार आहोत? तब्ब्येतीसाठी जीमच पाहिजे असे नाही. दण्डबैठका, योगासने ह्यांच्या साहाय्यानेही ही किमया साधता येते. ज्युदो-कराटे हे तर बौध्द भिःखुंनी शोधलेले अहिंसक प्रतिकाराचे वर्ग. आम्ही ते आमच्या तरूणांना-तरूणींना का शिकवत नाही? दलित वस्तीत विपश्यना केन्द्रे का उघडली जात नाहीत? ह्या संदर्भात बौध्द भिःखू काय करत आहेत? आज प्राध्यापक झालेल्या बौद्धांनीही बुद्धांचे साधे त्रिपिटीक वाचलेले नाही. हा कसला आळशीपणा? ह्या आळशीपणाचे दलित किती काळ समर्थन करणार आहेत? रामकृष्ण मठ वगैरे ठिकाणी आज हिंदू-दलितांना पूर्ण खुला प्रवेश आहे. तिथे हे दलित का जात नाहीत? मन्दिरप्रवेशाचे लढे आम्ही का सोडून दिले आहेत? इगतपुरीसारख्या विपश्यना केन्द्रात सुशिक्षित दलितांपेक्षा सवर्ण हिंदूंची संख्या कित्येक पटींनी अधिक आहे. दलित डॉक्टर्स, प्राध्यापकांना इथे जायला कोणी मज्जाव केला आहे?

दलितांनी बाबासाहेबांच्यानंतर किती शाळा उघडल्या? किती महाविद्यालये काढली? वास्तविक बाबासाहेबांनी जो ज्ञानाचा ठेवा उपलब्ध केला त्याच्या कितीतरी पुढे आम्ही जायला हवे होते. पण घोडे अडले कुठे? बाबासाहेब हे दलितांचे एकमेव नेते नव्हते. दक्षिणेत पेरियार यांनी बाबासाहेबांच्या तोडीचे काम केले आहे. अशा नेत्यांचे कार्य व विचारसरणी आम्ही किती समजून घेतली? दलितांच्या बाबत केलेल्या सवर्ण सुधारकांच्या कामगिरीचे आम्ही नीट मूल्यमापन केले आहे का?
(पुढे चालू)”
 
“भगवान निळे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content