Details
यारी गल्ली मित्र मंडळाने साकारला शेतकरी समस्यांचा देखावा
06-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतील वर्सोवा, यारी गल्ली मित्र मंडळाचा गणपती हा सर्वधर्मीय गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. येथील अल्पसंख्याक आणि इतर धर्माचे लोक येथील गणपतीच्या दर्शनाला आवर्जून येतात. यारी गल्ली मित्र मंडळ गेली अनेक वर्षं सामाजिक बांधिलकी जपत समाजात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आली आहे. त्यात गुढीपाडवा असो, लहान मुला/मुलींचे मोफत किल्ले दर्शन असो, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्यकला असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असो मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्वतोपरी जोमाने कामाला लागतात. सार्वजनिक गणेशोत्सवात विविधता आणण्याचा प्रयत्न सदर मंडळाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.
गणेशोत्सवात समाजाला संदेश सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यात “”पाणी हे पृथ्वीवरील अमृत””,””मेरा देश महान””, “”स्त्री भृणहत्त्या””, ”परिवर्तन हाच संसाराचा नियम”, असे अनेक देखावे सादर करून समाजात उद्भवणाऱ्या विषयाचे गांभीर्य ओळखून समाजात घडणार्यास घटनांची माहिती करून दिली जाते. याही वर्षी होणार्या गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, या विषयावर जनजागृती आणण्यासाठी सरकारने शेतकर्यां साठी सर्वतोपरी प्रयत्न करावा, हा त्यामागचा उद्द्येश आहे. असा छोटासा प्रयत्न रिक्षी रहाटे आणि ग्रुप करत आहे. मंडळाचे अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम यांनी ही माहिती दिली.
यंदा गणेशोत्सवात सदर मंडळाने विभागातील घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचबरोबर भजने, पाककला स्पर्धा, हरिपाठ, चित्रकला स्पर्धा, लेखनकौशल्य स्पर्धा असे अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहे. या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम, खजिनदार ह्रषिकेश कामत, शांताराम नेवरेकर तसेच कार्यकर्ते अभिषेक रासम, प्रतिक घाणेकर ,चंद्रकांत भागडे, जगदीश जोशी, संजय पाटील, शैलेश साळवी, विलास वाडकर आदींनी विशेष मेहनत घेतली आहे.”
केएचएल न्यूज ब्युरो
“मुंबईतील वर्सोवा, यारी गल्ली मित्र मंडळाचा गणपती हा सर्वधर्मीय गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. येथील अल्पसंख्याक आणि इतर धर्माचे लोक येथील गणपतीच्या दर्शनाला आवर्जून येतात. यारी गल्ली मित्र मंडळ गेली अनेक वर्षं सामाजिक बांधिलकी जपत समाजात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आली आहे. त्यात गुढीपाडवा असो, लहान मुला/मुलींचे मोफत किल्ले दर्शन असो, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्यकला असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असो मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्वतोपरी जोमाने कामाला लागतात. सार्वजनिक गणेशोत्सवात विविधता आणण्याचा प्रयत्न सदर मंडळाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.”
“गणेशोत्सवात समाजाला संदेश सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यात “”पाणी हे पृथ्वीवरील अमृत””,””मेरा देश महान””, “”स्त्री भृणहत्त्या””, ”परिवर्तन हाच संसाराचा नियम”, असे अनेक देखावे सादर करून समाजात उद्भवणाऱ्या विषयाचे गांभीर्य ओळखून समाजात घडणार्यास घटनांची माहिती करून दिली जाते. याही वर्षी होणार्या गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, या विषयावर जनजागृती आणण्यासाठी सरकारने शेतकर्यां साठी सर्वतोपरी प्रयत्न करावा, हा त्यामागचा उद्द्येश आहे. असा छोटासा प्रयत्न रिक्षी रहाटे आणि ग्रुप करत आहे. मंडळाचे अध्यक्ष या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम यांनी ही माहिती दिली.”
“यंदा गणेशोत्सवात सदर मंडळाने विभागातील घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. त्याचबरोबर भजने, पाककला स्पर्धा, हरिपाठ, चित्रकला स्पर्धा, लेखनकौशल्य स्पर्धा असे अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहे. या मंडळाचे अध्यक्ष सतीश परब, सचिव राजेश रासम, खजिनदार ह्रषिकेश कामत, शांताराम नेवरेकर तसेच कार्यकर्ते अभिषेक रासम, प्रतिक घाणेकर ,चंद्रकांत भागडे, जगदीश जोशी, संजय पाटील, शैलेश साळवी, विलास वाडकर आदींनी विशेष मेहनत घेतली आहे.”

