Homeमुंबई स्पेशलमंगळवार व बुधवारी...

मंगळवार व बुधवारी परळ परिसरात पाणी नाही!

मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ, काळेवाडी, नायगांव इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्याकरिता काही तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कामे योग्यप्रकारे होण्याच्या दृष्टीने मंगळवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत या परिसरातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात येथील रहिवाशांना पाणी मिळणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

या कालावधीत गोलंजी टेकडी जलाशयाच्या आतील परिसरातील ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे व ४५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्यात येणार असून ४५० मिलीमीटर व्यासाच्या २ जलवाहिन्या निष्कासित करण्यात येणार आहेत. ही बाब लक्षात घेता, पाणीपुरवठा खंडित करण्यात येणाऱ्या परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी- 

  • परळ गांव येथील गं. द. आंबेकर मार्ग ५० टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गांव मार्ग, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळिंभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड या परिसरांना दररोज दुपारी १.४५ ते सायंकाळी ४.४५ या कालावधीदरम्यान पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

ब) काळेवाडी येथील परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडी या परिसरांना दररोज रात्री ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

क) नायगांव येथील जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रींग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये बाजार, भोईवाडा गांव आणि हाफकिन या परिसरांना दररोज सकाळी ७.०० ते १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

तरी संबंधीत परिसरातील नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content