Homeटॉप स्टोरीयापुढे सार्वजनिक बँकांमधली...

यापुढे सार्वजनिक बँकांमधली भरती परीक्षा प्रादेशिक भाषांमधूनही!

सध्या सुरू असलेली सार्वजनिक क्षेत्रातल्या 12 बँकांमधली कारकून संवर्गाची भरतीप्रक्रिया राबवताना पूर्वपरीक्षा व मुख्यपरीक्षा हिंदी व इंग्लिशसोबतच 13 प्रादेशिक भाषांमधूनही व्हावी, तसेच यापुढील भरतीच्या वेळीदेखील हीच पद्धत वापरावी, अशी शिफारस केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs) कारकून संवर्गासाठी प्रादेशिक भाषेतून परीक्षा घेतली जाण्यासंबंधी अर्थ मंत्रालयाने गठीत केलेल्या एका समितीने केलेल्या शिफारशींवर हा निर्णय आधारित आहे.

सर्व ठिकाणच्या स्थानिक युवकांना रोजगाराची समान संधी मिळावी, तसेच ग्राहकांशी स्थानिक भाषेतून संवाद साधताना त्यांच्या भाषाकौशल्याचा फायदा मिळावा या हेतूने समितीने ही शिफारस केली आहे.

कारकून संवर्गाची परीक्षा प्रादेशिक भाषांमधून घेण्याचा हा निर्णय भारतीय स्टेट बँकेच्या भविष्यकाळातील रिक्त जागांसाठी लागू होईल. भारतीय स्टेट बँकेच्या सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील ज्या पदांची जाहिरात याआधीच प्रसिद्ध झाली होती व ज्यांची पूर्वपरीक्षा झालेली आहे, अशा पदांची भरती प्रक्रिया जाहिरातीत दिल्याप्रमाणे पूर्ण केली जाईल, असेही अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content