Homeमुंबई स्पेशलमीरा जगन्नाथ आणि...

मीरा जगन्नाथ आणि स्नेहामध्ये होणार का भांडण?

बिग बॉस मराठी सिझन ३ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली.. स्पर्धक कोण असतील? घर कसे असेल? याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. आणि रविवारी संध्याकाळी ७ वाजता महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली. सोबत सिद्धार्थ जाधवने उत्तम साथ देत पुन्हा एकदा सगळ्याची मने जिंकली..

स्नेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार यांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड संस्थेच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांची एंट्री झाली.

सोनाली पाटील यांची बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरात पहिली एन्ट्री झाली आणि त्यानंतर एक एक करून १४ सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात गेले. बिग बॉस मराठीचे आलीशान घर बघून सगळेच अवाक झाले..

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी झालं मीरा आणि जय यांच्यात होणारं भांडण.. तसंच मीरा आणि स्नेहामध्ये झालेली बाचाबाची. मीराने जयला सुनावले “जय, मला डोकं आहे”, तर स्नेहाने मीराला खडसावले “ही काय पद्धत आहे का बोलायची”?

घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो.. सगळेच चर्चेत असणार आहे. मीरा आणि स्नेहा तसेच मीरा आणि जयमध्ये वाद कशावरून झाला? पुढे काय झालं? हे आजच्या भागामध्ये कळेल..

पहिल्या नॉमिनेशनद्वारेच लढाईला प्रारंभ होणार आहे. सदस्यांचा पहिला दिवस कसा होता? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीयेमध्ये कोण कोण नॉमिनेट झाले, हे बघणं रंजक ठरणार आहे.. तेव्हा नक्की बघुया बिग बॉस मराठी सिझन ३, रात्री ९.३० वा., कलर्स मराठीवर..

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content