Homeएनसर्कल.. आणि रविदादांनी...

.. आणि रविदादांनी पुसले चिल्ड्रेन होममधल्या मुलांचे ओघळणारे अश्रू

तुम्हाला आठवतो का अभिनेत्ता संजीव कुमार आणि हे गीत…! ‘आया रे खिलौनेवाला, खेल खिलौने लेके आया रे..”! आया रे! तुम कहा… गये हो… मेरे प्यारो… असाच एक अनुभव दिवाळी २०२६ फराळच्या निमित्ताने आला. त्या सुपरहिट बचपन चित्रपटात संजीव कुमार जसा हातात बासरी आणि खेळणी घेऊन आपल्या लाडक्यांना साद घालतो, तशी साद मुंबई माहीम येथील डेव्हिड ससून चिल्ड्रन्स होममध्ये ऐकण्याचा प्रत्यय आला. डोळ्यांची पारणं फेडणारी मनमोहक विद्युत रोषणाई आणि दिव्यांची आरास पाहून मन प्रफुल्लित व्हावं असं वातावरण. पण अशाही लख्ख प्रकाशात नियतीने योजलेले अंधारातलं आंधळ जीवन जगणाऱ्या चिल्ड्रन्स होममधील मुलांच्या नशिबी दिवाळसणाचा आनंद कुठून येणार? कोण त्यांचे हट्ट आणि लाड पुरवणार? अवघं जग सणवार उत्सव साजरा करतं तेव्हा ह्या आपल्या आई, बाप, बहीण, भाऊ, मामा, मावशी यांना शोधणाऱ्या नजरा आणि त्यातून घराच्या आठवणींनी कळतनकळत गालावरून ओघळणारे अश्रू पुसण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यातून सात्विक समाधान मिळतं, अनेक नियतकालिके व सोशल मीडियांशी संवाद साधताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. रवि (दादा) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अशा प्रसंग व कार्यक्रमातून मी माझं हरवलेलं, करपलेलं बालपण शोधत असतो, असं ते म्हणाले. हे सर्व सांगताना दादांना गहिवरून आले आणि जेव्हा फराळाचा पुडा घेणाऱ्या मुलानं त्यांना कडकडून मिठी मारली तेव्हा सर्वांचे डोळे भरून आले. हा हृदयद्रावक प्रसंग होता मुंबई माहीम येथील डेव्हिड ससून औद्योगिक शाळा आणि चिल्ड्रन्स होममधला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटच्या वतीने तेथे नुकताच “दीपावली २०२६”च्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने प्रत्येकाने आपलं हरवलेलं बालपण शोधत बालपणातील आठवणींना उजाळा दिला. डॉ. सीमा टिबरेवाल, चिदंबरम बी., कुलकर्णी, अॅड. यशवंत गंगावणे, नासीर पठाण, प्रा. हेमंत सामंत, वरिष्ठ छायाचित्रकार अतुल राजकुळे, बबन मोरे, प्रकाश दुपारगुडे, अरुण वडनेरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गेली तीस वर्षे रविदादा फराळ वाटपासह अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रम अनोख्या पद्धतीने राबवित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

ईक्षा देसाईंचे वयाच्या आठव्या वर्षींचे स्वप्न साकार! झाल्या ‘मिसेस इंडिया’!!

मुंबईतल्या अशोकवन, दहिसर (पूर्व) येथील मानसशास्त्रज्ञ ईक्षा देसाई यांनी वयाच्या आठव्या वर्षी पाहिलेले स्वप्न अखेर सत्यात उतरवले आहे. द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट 'मिसेस इंडिया विजेती २०२६' म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह समाजात आनंदाची लाट उसळली आहे. यासोबतच...

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ३० नोव्हेंबरला?

महिला आरक्षणाला जोडून देशातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी आणि ही प्रक्रिया २०२९च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन होणार असल्याचे समजते. येत्या ३० नोव्हेंबरला लोकसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होईल तर दोन डिसेंबरला राज्यसभेत एका...

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...
Skip to content