Homeन्यूज ॲट अ ग्लांसनेपाळमध्ये पुन्हा महापूर!...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या परिसरातले अनेक किलोमीटरचे रस्ते नदीत रूपांतरीत झाले. कित्येक घरे, त्यातले सामान, वाहने या पुरात वाहून गेली.

आज सकाळी आभाळ भरलेले असले तरी पावसाचा पत्ता नव्हता. मात्र नंतर अचानक पाऊस सुरू झाला आणि अचानक बूढी गंडकी नदीला महापूर आला. ढागफुटी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज वर्तवली जात आहे. या पुरामुळे नेपाळच्या हायड्रो पॉवर प्रोजेक्ट साईटचे प्रचंड नुकसान झाले. गोरखा जिल्ह्यातला जगत बाझार, सलेरी बाजार पूर्णपणे वाहून गेल्याचे कळते. या पुरामुळे येथील जनतेला दीड महिन्यापूर्वी २६ ऑगस्टला नेपाळमध्ये झालेल्या महाजलप्रलयाची आठवण झाली. बूढी नदीचे पाणी पुढे त्रिशूला नदीलाच जाऊन मिळते. २६ ऑगस्टला याच त्रिशूला नदीला महापूर आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content