Homeबॅक पेजविद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची...

विद्याधरअण्णांपासून वाघ साहेबांची आठवण करून देणारं ‘सुखन ए पान’!

गेला आठवडाभर गुन्हेगारी जगत व राजकीय बातम्याची सैर केल्यानंतर काहीतरी हलकफुलकं मनोरंजन हवं होतं. मनाला ‘सुकून’ मिळेल असं काहीतरी हवं होतं हे ‘सुकून’ पत्रकार मनीष वाघ याने सहज घडवून आणलं. मनीषने ‘सुखन ए पान’चे आवतनच दिल होतं. मनीष वाघ म्हणजे १९९०च्या दशकात मुंबई गाजवणारे मराठी सायंदैनिक ‘सांज लोकसत्ता’चे संपादक चंद्रशेखर वाघ यांचे सुपुत्र! ठाणे शहरात राहूनही त्याची व माझी भेट याप्रसंगीच झाली. तसे आम्ही संपर्कात होतोच!

ठाणे (प ) येथील माजिवडा परिसरातील प्रिया सहकारी गृह निर्माण संस्थेच्या प्रिया कॅफेमध्ये (लोढा समूह) हा शानदार समारंभ संपन्न झाला.

अण्णांनी दिलेला पान डबा

यावर्षीच्या गणपती आगमनाची वेळ जशी जवळ आली तसे घराची साफसफाई करण्यास मनीषने सुरुवात केली. अनेक कागदपत्रे, निवेदने, अहवालाच्या पुस्तिका वगैरे कपाटातून रद्दीवाल्याला देण्यासाठी बाहेर काढले गेले. त्यात एक छोटा चांदीचा चौकोनी डबा सापडला. हा पानाचा सुबक डबा वाघ साहेबांना लोकसत्ताचे संपादक व नाटककार विद्याधर तथा अण्णा गोखले यांनी भेट म्हणून दिला होता. वाघ साहेबांना पान खाणे आवडत होते. पण ते पट्टीचे पान खाणारे, खरंतर चघळणारे नव्हतेच! अण्णांनी दिलेला तो पान का डिब्बा, मनीषने ठेवून घेतला व येथेच त्याला ‘सुखन ए पान’ची कल्पना सुचली व वाघ साहेबांच्या जयंतीनिमित्त ही पुस्तिका प्रकाशित करायचे ठरवले. या प्रकाशन समारंभासाठी ऍड. मनोज वैद्य व सहकाऱ्यांनी मोठे सहकार्य केले. (वाघ साहेबांची जयंती 2 ऑक्टोबरला होती.)

संस्कृतीची चव, तहजीब

पान खाणे म्हणजे एका संस्कृतीची चव, एका तहजीबची चव आणि नात्यांमधील आपुलकीची हिरवाई – ताजेपण जपणारी. ‘पान खाए’ संस्कृतीचे माझे आकर्षण वाढले असे सांगून मनीषने सांगितले की, उर्दू शायरीच्या नजाकतीने सजलेला शब्द आणि मराठी मनाची संवेदनाशीलता यांच्यामध्ये सुंदर पूल बांधण्याच्या हेतूनेच ही पुस्तिका तयार केली आहे. पानाच्या एका विड्यातून प्रेम, सौंदर्य, आठवण, मैत्री, पाहुणचार व संस्कृती यांचा परिचय शायर करून देत असतो. त्याचाच मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

“बनारस की गलियों मे जब पान सजता है,

हर राहगीर का दिल थोडा सा मचलता है…”

तसेच

“सुना के कोई कहानी हमे सुलाती थी,

दुआओ जैसी बडे पान – दान की खुशबू..” (बशीर)

या आणि अशा काही पान खाण्याच्या शायरीवर मनीषने लिहलं आहे ते मुळातूनच वाचायला हवं व दादही द्यायला हवी.

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पूर्णेकरांवर झाडलेल्या गोळ्या पप्याच्या ‘घोड्या’तूनच!

प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्यावर झाडलेल्या गोळ्या पप्या शिंदेच्या 'घोड्या'तूनच असल्याचे वृत्त हाती येत आहे. पोलिसांचे अजून विश्लेषणच सुरू आहे. "थांब! प्रकाशाची चूड आताच पेटवू नको आपुल्याच तोऱ्यात पुढे पुढे सरकू नको नाहीतर मलाही हाती खडग घ्यावे लागेल मित्रा! एव्हडा प्रसंग मजवर आणू...

ठाण्यात पोलिसांसमोरच तुडवले जाते तर नेते पाहतही नाहीत सूर्योदय!

एखादी ओटीटीवरील सिरीज पाहतोय असं तर वाटतं नाही? मलाही प्रथम असच वाटत होतं. पण ठाणे शहरात घटनाच अशा घडत आहेत की ओटीटी निर्मात्यांनीही तोंडात बोटे घालावीत! कालच्या गुरुवारी मध्यरात्रीपासून ठाणे पोलिसांचे जणू ग्रहच बदललेत असं वाटतं. शुक्रवार-शनिवार गणपती विसर्जनात...

नामचीन गुंडाला ‘पिंजरा’ दाखवताच पोलीस अधिकारी यमसदनी!

ठाण्यात पाच दिवसांपूर्वी, 24 तारखेच्या रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका अट्टल गुन्हेगाराने सिमेंटची वीट डोक्यात घालून ड्युटीवरील पोलीस उपनिरीक्षकास जीवे मारले. कारण काय तर म्हणे राऊंडवर असताना मला 'पिंजऱ्यात' का टाकले? (पिंजरा म्हणजे पोलिसांची जाळीदार गाडी). स्थळ- पोखरण रस्ता...
Skip to content