Homeचिट चॅटवर्गमित्र-मैत्रिणींसोबतच्या प्रत्यक्ष संवादाला...

वर्गमित्र-मैत्रिणींसोबतच्या प्रत्यक्ष संवादाला आसुसले विद्यार्थी!

कोरोना महामारीचा जगावरील सर्वात मोठा प्रभाव म्हणजे प्रत्यक्ष दळणवळण आणि एकत्र भेटण्यावरील मर्यादा. देशभरातील शाळा या ऑनलाईन सुरू असून यादरम्यान विद्यार्थी आपल्या वर्गमित्रांसोबतच्या प्रत्यक्ष संवादाला आसुसले असल्याचे ब्रेनली, या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग मंचाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणात सामील सुमारे २००० विद्यार्थ्यांपैकी ८१% विद्यार्थ्यांनी मित्र किंवा वर्गमित्रांशी प्रत्यक्ष संवाद साधू शकत नसल्याची खंत व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात वर्गमित्रांशी सौहार्दपूर्ण संवाद हा खूप महत्त्वाचा भाग असतो. प्रत्यक्ष शाळांमध्ये विद्यार्थी केवळ शिकतच नाहीत, तर त्यांच्या वर्गमित्रांसोबत सामाजिक संवादातूनही शिकत असत असतात, असे सर्वेक्षणातून दिसून आले. तसेच ब्रेनलीच्या ७५% विद्यार्थ्यांना शाळेची आठवण होते, हेही यातून स्पष्ट झाले. या निरीक्षणातून प्रत्यक्ष वर्गांची प्रासंगिकता पुन्हा एकदा अधोरेखित केली गेली आणि सर्वोत्कृष्ट डिजिटल आणि शिक्षणाच्या प्रत्यक्ष पद्धतींचा मिलाप असलेल्या हायब्रिड भवितव्यासाठी शाळाच कशा पुढे असतील, हे त्यातून दिसून आले.

लहान मुले असो वा प्रौढ.. साथीचा आजार प्रत्येकासाठी कठीण ठरतो. घरात राहून शिक्षण घेताना तणाव जाणवला का, असे विचारले असता ४५% विद्यार्थ्यांनी होकारार्थी उत्तर दिले. मुले तणावमुक्त करण्याचे उपक्रम घेत, त्यांच्या परीने विद्यार्थी त्यात सहभागी होतील, असे प्रयत्न शाळा करत आहेत. ६८% भारतीय विद्यार्थी म्हणाले की, घरी राहून शारीरिक शिक्षण घेण्यासाठी शाळा त्यांना प्रोत्साहित करतात.

विद्यार्थी

याचवेळी, असेही दिसून आले की, तणावपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांचा वापर करत आहेत. मग त्यात पालक अथवा इंटरनेटची मदत यांचाही समावेश होतो. ब्रेनलीच्या ४६% विद्यार्थ्यांच्या मते, ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममुळे घरी राहून अभ्यास करणे सोयीचे ठरत आहे. विद्यार्थ्यांचा हा अनुकूल प्रतिसाद पाहता, आघाडीचे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म, पीअर-टू-पीअर ज्ञान आदानप्रदान आणि चर्चा करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात, हे त्यामागील कारण असावे. कारण, विद्यार्थी वर्गमित्र आणि समवयस्करांसोबत प्रत्यक्ष संवादासाठी आसुसले आहेत.

मोकळ्या वेळेचा वापर छंद जोपासण्यासाठी: सर्वेक्षणात सामील ५६% विद्यार्थी त्यांचा मोकळा वेळ इतर अॅक्टिव्हिटी आणि छंदासाठी देतात. विद्यार्थी ज्यात रस घेतात, अशा काही मनोरंजनात्मक गोष्टींमध्ये नव्या अॅक्टिव्हिटी (४४%), टीव्ही पाहणे (३२%), व्हिडिओ गेम खेळणे (३०%), मित्रांसोबत हँगआऊट करणे (३०%) आणि सोशल मीडिया सर्फिंग करणे (१८%) यांचा समावेश होतो.

ब्रेनलीचे मुख्य उत्पादन अधिकारी राजेश बिसानी म्हणाले की, आमच्या ताज्या सर्वेक्षणानुसार असे दिसून आले की, भारतीय विद्यार्थ्यांनी घरी राहून तणावपूर्ण अभ्यासाशी जुळवून घेतले असले तरीही ते प्रत्यक्ष वर्गात जाण्यास उत्सुक आहेत. यावरून तंत्रज्ञान मित्रांसोबतच्या संवादाची जागा घेऊ शकत नाही, हे स्पष्ट होते. विशेष बाब म्हणजे, ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म ४६% भारतीय विद्यार्थ्यांसाठी घरी राहून अभ्यास करणे सुलभ करत आहेत. म्हणजेच, साथीचा आजार कमी झाल्यानंतर तसेच शाळा पुन्हा उघडल्यानंतरही विद्यार्थी आणि पालक त्यांच्या शिक्षण प्रवासातील मदतीकरिता या सेवांचा वापर करतच राहतील.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content