Homeबॅक पेजसामान्य आणि तत्काळ...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, ‘सामान्य’ आणि ‘तत्काळ’ श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या ‘प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही मोहीम येत्या शनिवारी, 6 जूनला पुण्यातल्या पासपोर्ट सेवा केंद्रात राबवण्यात येणार आहे.

ज्या पासपोर्ट अर्जदारांनी ‘सामान्य’ श्रेणीअंतर्गत अर्ज केला असेल, त्यांनी नियमांनुसार आवश्यक असलेली सर्व योग्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. दिलेल्या नियोजित वेळेच्या दिवशी गैरसोय होऊ नये यासाठी, अर्जदारांनी ‘पासपोर्ट इंडिया’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि आपल्याकडे आवश्यक आणि पर्याप्त कागदपत्रे आहेत हे निश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीची असल्यास, अर्ज स्वीकारला जाणार नाही.

‘तत्काळ’ श्रेणीअंतर्गत काही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असते. तसंच, पात्रतेचे निकष अधिक कठोर आहेत. बरेच अर्जदार यांतील एक किंवा दोन्ही निकष पूर्ण करण्यात अयशस्वी होतात. त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारला जात नाही. अर्जदारांना विनंती आहे की त्यांनी, ‘तत्काळ’ श्रेणीसाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि हमीपत्र काळजीपूर्वक वाचावे तसेच नियोजित वेळेच्या दिवशी कोणतीही संभाव्य अडचण उद्भवू नये म्हणून आपल्याकडील कागदपत्रे तपासून घ्यावीत. ‘तत्काळ’ श्रेणीत अपात्र ठरणाऱ्या गोष्टींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढच्या संकेतस्थळाला भेट द्या: https://www.passportindia.gov.in/psp/TatkaalPassports

अशी वेळ घ्या या विशेष मोहिमेसाठी:

  1. पासपोर्ट इंडियाच्या (https://www.passportindia.gov.in) या संकेतस्थळावर किंवा mPassport Seva  या अॅपवर, ‘तत्काळ’ अथवा ‘सामान्य’ श्रेणींतर्गत आपला अर्ज सादर  करा.
  2. पैशांचा ऑनलाईन भरणा केल्यानंतर ‘schedule appointment’ पेजवर जाऊन, ‘PSK Pune स्थळ निवडा, आणि तुम्हाला हव्या असेल त्या विशिष्ट दिवसासाठी नियोजित वेळ घेऊन टाका.

या विशेष मोहिमेच्या तारखा आणि स्थळांचा तपशील :

  1. तारीख: 6 जून 2026 (शनिवार)
  2. स्थळ: माउंट क्लेर बिल्डींग, स. नंबर 134/1, पार्ट एम्प पी -1, कमर्शिअल, 1ला मजला, ऑफिस नंबर 101 आणि 102, बाणेर-पाषाण लिंक रोड, पाषाण, पुणे – 411021
  3. श्रेणी: सामान्य आणि तत्काळ साठी नियोजित वेळा (नवीन आणि पुन्हा जारी करण्यासाठी)
  4. वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 5 (अर्जदारांनी, ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर दिलेल्या भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी पोहोचावे.)

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content