Homeडेली पल्सपुण्यात आजपासून रंगणार...

पुण्यात आजपासून रंगणार केंद्रीय विद्यालयांतल्या मुलांचे क्रिकेट

केंद्रीय विद्यालय संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 55व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेंतर्गत 17 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा आजपासून पुण्यात सुरू होत आहे. 1 नोव्हेंबरला या स्पर्धेचा समारोप होईल. केंद्रीय विद्यालय संघटनेच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या आयोजनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 आणि 2, वायुसेना स्थल, पुणे भूषवणार आहेत. या स्पर्धेत 25 संघांतील सुमारे 350 खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज सकाळी 10 वाजता लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीतील एकेपीसी क्रिकेट मैदानावर होणार आहे. एअर कमोडोर सतबीर सिंह राय, व्हीएम, एअर ऑफिसर कमांडिंग, 2 विंग, वायुसेना स्थल, पुणे तथा पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1च्या विद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभात हरित स्वागत, स्वागतगीत, ध्वज समारंभ, संचलन, क्रीडाज्योत दौड, खेळाडूंचा शपथविधी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. स्पर्धेतील सामने गुरुद्वारा परिसरातील एकेपीसी क्रिकेट मैदान, वीरांगण क्रिकेट अकादमी, विज्डम क्रिकेट अकादमी (सर्व लोहगाव) आणि महालक्ष्मी क्रिकेट अकादमी, खराडी या चार मैदानांवर खेळविण्यात येणार आहेत. सुरुवातीला गटवार साखळी सामने होतील. त्यानंतर प्रत्येक गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविणाऱ्या संघांमधून उपांत्यपूर्व फेरीसाठी संघ निश्चित केले जातील. पुढे उपांत्य फेरीचे सामने होतील आणि 1 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होईल.

सामन्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी (एमसीए) संलग्न 20 पंचांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 व 2, वायुसेना स्थळ, पुणे येथे करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन, मुंबई विभागाचे उपायुक्त बी. के. बेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 चे प्राचार्य राजेंद्र वडाळकर आणि केंद्रीय विद्यालय क्रमांक 2चे प्राचार्य भारत भूषण यांच्या नेतृत्त्वात स्पर्धेच्या आयोजनाची तयारी करण्यात आली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमुळे युवा क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यांच्यातल्या संघभावना, शिस्त आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मोदी सरकारकडून ‘ऑपरेशन ट्रायडंट’ सुरू!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने देशभरात अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत एनसीबीच्या 38 पथकांनी आसाम, मिझोराम आणि मणिपूर या तीन राज्यांतील...

राज्यात पाइप गॅसच्या जोडण्यांसाठी 31 मार्चपर्यंत विविध सवलती!

जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत 31 मार्च 2027पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या 24 तासांत देणे, काही शुल्क माफ...

उपसभापती सचिन अहिर दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर

राज्य विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर सध्या दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी कर्नाटक विधान भवनाला भेट दिली. कर्नाटक राज्याच्या विधान परिषद कामकाजानिमित्त आयोजित या अभ्यासदौऱ्यात उपसभापती अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती सलिम अहमद आणि...
Skip to content