Homeचिट चॅटआधार समुदाय पोहोच...

आधार समुदाय पोहोच शिबिरांचे यशस्वी आयोजन

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे २०२६ रोजी नवी मुंबईतल्या महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार समुदाय पोहोच (Outreach) शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली. या शिबिरांचा मुख्य उद्देश स्थानिक व वंचित समुदायातील नागरिकांना त्यांच्या निवासस्थानाजवळ आधार संबंधित विविध सेवांची सुसुलभ उपलब्धता सुनिश्चित करणे हा होता. UIDAI ने डिजिटल समावेशन आणि नागरिक सुलभता यांना प्राधान्य देत अशाप्रकारच्या समुदाय-आधारित उपक्रमांद्वारे आधार सेवांना अधिक सर्वसमावेशक स्वरूप दिले आहे.

आधार

शिबिरांमध्ये होता या प्रमुख सेवांचा समावेश:

– लहान मुलांची नवीन आधार नोंदणी

– डेमोग्राफिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी) अद्ययावतीकरण

– मोबाईल नंबर लिंकिंग व अपडेट  

– बायोमेट्रिक अपडेट (हातांचे ठसे व आयरिस स्कॅन)  

या सर्व प्रक्रिया UIDAIच्या कठोर सुरक्षा नियमावली, पडताळणी प्रोटोकॉल आणि गोपनीयता मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्ण पालन करून पार पाडण्यात आल्या. विशेष म्हणजे, या शिबिरांमध्ये लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अनेक बालकांनी प्रथमच आधार नोंदणी व अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण केले. स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. आधार सेवा घराजवळ उपलब्ध झाल्याबद्दल नागरिकांनी UIDAIच्या ASK वाशी केंद्र, NHRC आणि TISSच्या टीमचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले. UIDAI सर्व नागरिकांना उच्च दर्जाची, सुरक्षित आणि सर्वसमावेशक डिजिटल ओळख सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content