Homeटॉप स्टोरीउद्यापासून दोन दिवस...

उद्यापासून दोन दिवस मुंबई पिंजून काढणार नारायण राणे!

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे उद्यापासून दोन दिवस संपूर्ण मुंबई पिंजून काढणार आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने दाखल झालेले मंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जन आशिर्वाद यात्रा काढल्या जात आहेत. या यात्रांमधली ही शेवटची यात्रा आहे.

या यात्रेसाठी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सकाळी १० वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. आमदार सुनील राणे व बलवीर नेगी त्यांचे स्वागत करतील. सकाळी सव्वादहा वाजता नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतील. तेथे त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही होईल. मिलिंद शिंदे तेव्हा राणे यांचे स्वागत करतील. १०.५५ वजता नारायण राणे टीचर्स कॉलनी येथे पश्चिम महामार्गावर उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करतील. माजी आमदार तृप्ती सावंत, प्रवीण नलावडे, राजेश जैन त्यांचे येथे स्वागत करतील.

सव्वा अकरा वाजता नारायण राणे माहीम कोळीवाडा येथील स्वामी विवेकानंद उद्यान येथे जातील. विलास आंबेकर त्यांचे येथे स्वागत करतील. ११.२५ वाजता ते माहीम दर्गा-कापड बाजार येथे जातील. शीतल गंभीर-देसाई व जतीन देसाई त्यांचे येथे स्वागत करतील. ११.३५ वाजता हिंदुजा हॉस्पिटल येथे अजित सिंह त्यांचे स्वागत करतील. तेथून नारायण राणे वीर सावरकर स्मारकाला भेट देतील. ११.४५ वाजता राजेश शिरवडकर त्यांचे स्वागत करतील. १२ वाजता ते बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देतील. नीरज उभारे त्यांचे तेथे स्वागत करतील. सव्वाबारा वाजता राणे चैत्यभूमीला भेट देतील. शंकर कांबळे त्यांचे तेथे स्वागत करतील. १२.२५ वाजता ते प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिराला भेट देतील. आचार्य पवन त्रिपाठी, सचिन शिंदे तेथे त्यांचे स्वागत करतील.

१२.३५ वाजता नारायण राणे यांचे फुल विक्रेता संघाकडून उदयप्रताप सिंह स्वागत करतील. रविंद्र नाट्य मंदीर, सेंच्युरी बाझार, मराठा उद्योग भवन, दूरदर्शन केंद्र, बीडीडी चाळ, जांबोरी मैदानमार्गे ते दुपारी दीड वाजता वरळी नाका येथील भिवंडीवाला चाळ येथे जातील. दीपक पाटील येथे त्यांचे स्वागत करतील. तेथे राणे यांचे भाषण होईल. पावणेदोन वाजता दीपक सावंत त्यांचे गणपतराव कदम मार्गावर स्वागत करतील. सव्वादोन वाजता भोईवाडा जंक्शन येथे आमदार कालीदास कोळंबकर व विजय डगरे, राणे यांचे स्वागत करतील. तेथे त्यांचे भाषणही होईल.

पावणेतीन वाजता सायन कोळीवाडा- सायन हॉस्पिटल आणि ३.१० वाजता सायन सर्कल येथे त्यांची भाषणे होतील. आमदार कॅप्टन तामीळ सेल्वन तसेच आमदार प्रसाद तेथे त्यांचे अनक्रमे स्वागत करतील. ३.३० वाजता बहुउद्देशीय केंद्र, ३.४५ वाजता अण्णासाहेब साठे पूल आणि ४ वाजता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनजवळ जातील. सचिन राणे, महादेव शिगवण, राहुल वाळंज आणि आशा मराठे त्यांचे या स्थळांवर अनुक्रमे स्वागत करतील. डॉ. आंबेडकर गार्डन येथे राणे यांचे भाषणही होईल.

साडेचार वाजता चेंबूर स्थानकापासून सुभाष नगर येथे जातील. वीरसिंह देवारिया त्यांचे येथे स्वागत करतील. पावणेपाच वाजता सुभाष नगर, पाच वाजता छ. शिवाजी महाराजांचा पुतळा येथे ते जातील. दिनेश पांचाळ त्यांचे स्वागत करतील. सव्वापाच वाजता वडाळा येथील बरकत अली नाका येथे ते पोहोचतील. संतोष गुप्ता त्यांचे येथे स्वागत करतील. ५.२० वाजता डॉन बॉस्को सर्कल, साजेपाच वाजता फाईव्ह गार्डन, ५.४० वाजता दादर टी.टी. येथे ते जातील. सहा वाजता लालबागचा राजा येथे नारायण राणे यांचे भाषण होईल. दिलीप धुरी, राजेश हाटले त्यांचे येथे स्वागत करतील. साडेसहा वाजता सात रस्ता येथे नितीन बनकर त्यांचे स्वागत करतील. पावणेसात वाजता आग्रीपाडा येथे रोहिदास लोखंडे तर सात वाजता नाना चौक येथे अजय चौरसिया राणे यांचे स्वागत करतील.

७.१० वाजता सैफी हॉस्पिटल, साडेसात वाजता हुतात्मा चौक येथे ते जातील. हुतात्मा चौकात आमदार राहुल नार्वेकर त्यांचे स्वागत करतील. रात्री आठ वाजता ते गिरगाव चौपाटी येथे शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला माल्यार्पण करतील. साडेआठ वाजता महालक्ष्मी मंदिर येथे त्यांची संतांशी चर्चा होईल.

शुक्रवारीही मुंबईत

शुक्रवारी सकाळी नऊ जुहूमध्ये स्वच्छता अभियानात भाग घेऊ त्यांचा दौरा पुन्हा सुरू होईल. आमदार अमित साटम येथे त्यांचे स्वागत करतील. साडेनऊ वाजता नारायण राणे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतील. आमदार मंगलप्रभात लोढा तसेच सुनील राणे यावेळी उपस्थित असतील. दहा वाजता खार दांडा येथे किशोर पुनवत त्यांचे स्वागत करतील. तेथे राणे यांचे भाषण होईल. साडेदहा वाजता सी.डी. रोड, १०.४० वाजता मीलन सब वे जंक्शन, १०.५० वाजता नानावटी हॉस्पिटल, १०.५५ वाजता विलेपार्ले पूर्व, ११ वाजता अंधेरी पूर्व येथे ते जातील. वीरेंद्र म्हात्रे या सर्व ठिकाणी त्यांचे स्वागत करतील.

११.१० वाजता चकाला येथे राणे यांचे भाषण होईल. ११.२५ वाजता अपना ढाबा जंक्शन, ११.३५ वाजता चिमटपाडा जंक्शन, पावणेबारा वाजता चांदिवली भाजपा कार्यालय आणि १२ वाजता भटवाडी गणेश मंदिर येथे ते पोहोचतील. चांदिवली तसेच भटवाडी येथे त्यांची भाषणे होतील. चांदिवली येथे प्रकाश मोरे तर भटवाडी येथे अशोक राय त्यांचे स्वागत करतील. सव्वाबारा वाजता ते घाटकोपर पूर्व येथे पोहोचतील. अनिरूद्ध गोडसे येथे त्यांचे स्वागत करतील. १२.३५ वाजता पंत नगर, १२.४५ वाजता नायडू कॉलनी येथे राणे जातील. १.१० वाजता कन्नमवार नगर जनता मार्केट, १.२५ वाजता नवघर रोड, पावणेदोन वाजता डॉ. हेडगेवार चौक, १.५५ वाजता शिवाजी तलाव-कोकण नगर, दोन वाजता विक्रोळी गांधी नगर आणि २.१० वाजता मजास तलाव येथे ते पोहोचतील. अशोक गोगरी येथे त्यांचे स्वागत करतील. तेथे त्यांचे भाषण होईल.

अडीच वाजता राणे पूनम नगर नाका येथे पोहोचतील. अनंत परब त्यांचे स्वागत करतील. पावणेतीन वाजता अस्मिता शाळेकडे जयप्रकाश ठाकूर त्यांचे स्वागत करतील. सव्वातीन वाजता ओबेरॉय मॉल येथे त्यांचे भाषण होईल. विजय गायकवाड तेथे त्यांचे स्वागत करतील. पावणेचार वाजता चिंचोली बंदर येथे योगेश वर्मा, राणे यांचे स्वागत करतील. चार वाजता सुनील कोळी त्यांचे न्यू ईरा टॉकीज परिसरात स्वागत करतील. कांदिवलीत भाजपाच्या जिल्हा कार्यालयाकडे त्यांचे भाषण होईल. लीना देहरकर त्यांचे येथे स्वागत करतील. सव्वाचार वाजता प्रतिभा गिरकर कांदिवलीच्या डहाणूकर वाडी येथे त्यांचे स्वागत करतील. साडेचार वाजता हिंदुस्तान नाका येथे कमलेश यादव त्यांचे स्वागत करतील. पाच वाजता नोबल मेडिकल नाका येथे राणे यांचे भाषण होईल. बाळा तावडे त्यांचे येथे स्वागत करतील.

गोराई ब्रीजपुढे मंगलमूर्ती हॉस्पिटल येथे शिवानंद शेट्टी त्यांचे स्वागत करतील. तेथे राणे यांचे भाषण होईल. साडेसहा वाजता देवीदास लेन येथे अंजली खेडकर त्यांचे स्वागत करतील. तेथे राणे यांचे भाषण होईल. पुढे दौलत नगर येथे अरविंद यादव त्यांचे स्वागत करतील. पावणेसात वाजता चुनाभट्टी सिग्नलवर प्रकाश दरेकर त्यांचे स्वागत करतील. सात वाजता देवीपाडा येथे संजय मोरे व स्वप्नील देसाई त्यांचे स्वागत करतील. सव्वासात वाजता टाटा पॉवर हाऊस येथे राणे यांचे भाषण होईल. आसावरी पाटील व सिद्धांत भोसले त्यांचे येथे स्वागत करतील. पावणेआठ वाजता समता नगर पोलीसठाण्याजवळ अप्पा वेलणकर त्यांचे स्वागत करतील. रात्री आठ वाजता पठाणवाडी येथे राजहंस सिंह, राणे यांचे स्वागत करतील. तेथेच त्यांचे समारोपाचे भाषण होईल.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content