Homeडेली पल्सआठवलेंची 'आरपीआय' उत्तर...

आठवलेंची ‘आरपीआय’ उत्तर प्रदेशात लढवणार विधानसभा निवडणूक!

उत्तर प्रदेशातील आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ने राज्यात आपली ताकद आजमावण्याची तयारी पूर्ण केली आहे. भाजपासोबतच्या महायुतीत (एनडीए) राहून आरपीआयने उत्तर प्रदेशात २५ जागांची मागणी केली आहे. दलित आणि मागासवर्गीय मतांच्या जोरावर राज्यात आपला विस्तार करण्याचा पक्षाचा मानस आहे. पक्षाची ताकद दाखवण्यासाठी आणि निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी आरपीआयने २६ नोव्हेंबर २०२६ रोजी, म्हणजेच संविधान दिनी, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका भव्य ‘महारॅली’चे आयोजन केले आहे. या रॅलीच्या माध्यमातून रामदास आठवले राज्याच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करतील. संविधानाचे संरक्षण आणि दलितांचे हक्क हा या रॅलीचा मुख्य अजेंडा असणार आहे. या रॅलीद्वारे भाजपला आरपीआयच्या जनाधाराची जाणीव करून दिली जाणार आहे, जेणेकरून जागावाटपाच्या चर्चेत पक्षाचे पारडे जड राहील.

एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये जागांसाठी चढाओढ

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत केवळ आरपीआयच नव्हे, तर चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) आणि इतर छोटे मित्रपक्षही मोठ्या प्रमाणात जागांची मागणी करत आहेत.

आठवले

स्वबळावर जास्त जागा लढण्याचीही तयारी

आरपीआयने स्पष्ट केले आहे की, त्यांना सन्मानजनक जागा मिळाल्यास ते भाजपसोबत युती करतील. मात्र, युती न झाल्यास स्वबळावर अधिक जागा लढवण्याचे संकेतही पक्षाकडून देण्यात आले आहेत. मागील निवडणुकांमध्ये आरपीआयने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण यावेळी पक्ष थेट निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक आहे.

राजकीय धोरण: बसपाच्या ‘व्होट बँक’वर नजर

मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची (बसपा) पकड उत्तर प्रदेशात ढिली होत असताना, आरपीआयला त्याठिकाणी मोठी संधी दिसत आहे. ‘जय भीम-जय भारत’चा नारा देत दलित मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी रामदास आठवले आक्रमक झाले आहेत. लखनौमधील महारॅली हा याच रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. एकूणच, रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या रणांगणात उतरण्याची घोषणा केल्यामुळे भाजपसमोर मित्रपक्षांच्या जागावाटपाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नोव्हेंबरमधील महारॅली उत्तर प्रदेशातील आरपीआयचे भवितव्य ठरवण्यात निर्णायक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

टिटवीच्या अंड्यांमध्ये दडलेय पावसाचे रहस्य!

देशातील काही भागात शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, टिटवीची अंडी मान्सूनच्या आगमनाचे आणि तीव्रतेचे अचूक संकेत देतात. टिटवीने दिलेल्या अंड्यांची संख्या, अंडी घालण्याची जागा यानुसार पारंपरिकरित्या, पिढ्या न् पिढ्या देशाच्या काही भागात मान्सूनच्या पावसाचे ठोकताळे आणि अंदाज बांधले जातात. अंड्यांची...

आता देशातच बनणार एमआरआय मशिन, चाचण्यांचे दर होणार ७०%पर्यंत कमी!

भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बेंगळुरूस्थित 'व्होक्सेल ग्रिड्स' या कंपनीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने भारताचे पहिले स्वदेशी एमआरआय...

दादरचे प्रमोद महाजन कलाउद्यान बहरले…

मुंबईत ठिकठिकाणी सार्वजनिक उद्यानांमध्ये तसेच काही रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांना सध्या बहर आला आहे. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दादरच्या प्रमोद महाजन कलाउद्यान सध्या असे बहरले आहे.
Skip to content