Homeन्यूज ॲट अ ग्लांसइराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेने होर्मूझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली आहे. ही नाकेबंदी संपुष्टात आणल्याखेरीज आम्ही अमेरिकेबरोबर कायमच्या युद्धविरामाच्या दृष्टीने चर्चा करणार नाही, असे इराणकडून सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानने या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आपली भूमी देऊ केली आहे. नाटोमधल्या युरोपीय देशांनी साथ देण्यास नकार दिल्यानंतर, अरब राष्ट्रांकडून युद्धविरामासाठी दबाव वाढत चालल्यामुळे तसेच अमेरिकेतल्या जनतेकडूनही होत असलेल्या वाढत्या विरोधामुळे हतबल झालेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कसेबसे हे युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत. इराण आपला आण्विक कार्यक्रम तसेच होर्मूझवरील आपले नियंत्रण सोडण्यास तयार नाही. याच मुद्द्यावर युद्धविरामानंतर दोन दिवसांतच पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झालेल्या अमेरिका आणि इराणची तब्बल २१ तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या नौदलाकरवी होर्मूझ सामुद्रधुनीची नाकेबंदी केली. या नाकेबंदीच्या माध्यमातून अमेरिकेने इराणच्या व्यापारी जहाजांना रोखून इराणची आर्थिक नाकेबंदी चालवली आहे. आजच अमेरिकेच्या नौदलाने इराणचे दुसरे व्यापारी जहाज तिफानी, ताब्यात घेतले. त्याआधी काल अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या टुस्का नावाच्या व्यापारी जहाजावर गोळीबार करून ते ताब्यात घेतले आहे.

अमेरिकेकडून असा लष्करी दबाव आणून आपल्या शर्तीवर इराणला चर्चेच्या माध्यमातून शरण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांना इराणला पाठवले. त्यांनी इराणच्या काही नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना वॉशिंग्टन डीसीमध्ये पाचारण करण्यात आले. त्यानंतर इस्लामाबादमध्ये युद्धविरामाच्या चर्चेची दुसरी फेरी निश्चित करण्यात आली. या चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये रेड झोन तयार करण्यात आला. अमेरिकेच्या दहा विमानांमधून त्यांच्या नेत्यांसाठी लागणाऱ्या गाड्या व सारा लवाजमा आला. अमेरिकेचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार बसले. परंतु इराणकडून चर्चेसाठी होकारच आला नाही. त्यामुळे अमेरिकेचे शिष्टमंडळ व्हाईट हाऊसमध्येच रेंगाळले. रात्री उशिरा इराणकडून चर्चेला नकार देण्यात आला. त्यामुळे आखाती देशांमध्ये उद्यापासून पुन्हा युद्ध पेटते की युद्धविराम लांबतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...
Skip to content