Homeचिट चॅटअमरप्रेम क्रीडा मंडळाचा...

अमरप्रेम क्रीडा मंडळाचा शनिवारी हीरक महोत्सवी कबड्डी सोहळा

मुंबईतल्या वरळी कोळीवाडा येथील अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमदार सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तबेला मैदान-श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्गचा “हिरक महोत्सवी सोहळा” येत्या शनिवारी, ११ एप्रिलला सायंकाळी ०५-०० ते १०-०० या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पूर्वीचे मुंबई व आताच्या मुंबई शहरच्या सर्व वरिष्ठ पुरुष व महिला गटाच्या संघनायक व संघनायिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरच्या वरिष्ठ गटातील प्रथम संघनायकांनादेखील यानिमित्ताने गौरविण्यात येईल.

मुंबईची कबड्डी वाढविण्यासाठी ज्या संघटनानी सातत्याने स्पर्धा आयोजन केले अशा आर्य सेवा मंडळ (६१ वर्ष), शिवनेरी सेवा मंडळ (५३ वर्ष), अमर क्रीडा मंडळ, दादर (४३ वर्ष) यांच्या बरोबरीने मातीची क्रीडांगणं बनविणारे, ते क्रीडांगण एकहाती सरळ रेषेत आखणारा अशोक गुरव आदींचा सत्कार होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंबरोबर महाराष्ट्रात गेली तीन तपे वास्तव्यास असलेली मोनिका बाकरे (नाथ) हिलादेखील निमंत्रित करण्यात आले आहे. सलग चार दशकांपेक्षा अधिक काळ कबड्डी खेळणारा विलास जाधव, बंगालला “टायगर” ही उपाधी मिळालेला वसंत सूद, ट्रॉफी बनविणारे हरीश परब, बनियन बनविणारे भुईम्बर आदी मान्यवरांचाही यावेळी सन्मान होणार आहे.

कबड्डीच्या कठीण काळात खेळाडूंना वैद्यकीय सुविधा मिळवून देणारे हाडवैद्य, ज्येष्ठ पत्रकार, कबड्डी समीक्षक, सर्वत्र कबड्डी पाहणारे चाहते आदींसह शालेय स्तरापासून खेळाडूंना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आदी मान्यवारांनाही यावेळी निमंत्रित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारी हिंदमाता सेवा मंडळ, मुंबईत प्रथम जागतिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारी साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब, कबड्डीत रोख रकमेची व मोठी पारितोषिके देणाऱ्या संघटनांचादेखील या सोहळ्यात सन्मान होणार आहे. या सोहळ्याला क्रीडाप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्येष्ठ्यांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण निर्माण करावेत, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राणा प्रताप तिवारी यांनी केले आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content