Homeटॉप स्टोरी८४ सामने-वेळापत्रक जाहीर!...

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले होते; पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित झाल्यानंतर आता उर्वरित ५० सामन्यांचेही वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. आयपीएलच्या १९व्या पर्वाची ही सुरुवात म्हणजे क्रिकेटविश्वासाठी एक मोठी दिवाळीच!

उद्घाटन सामना आणि ठळक वैशिष्ट्ये

विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना २८ मार्चला चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. त्यापाठोपाठ २९ मार्चला मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान स्वीकारेल, तर ३० मार्चला चेन्नई सुपर किंग्ज राजस्थान रॉयल्सविरुद्ध रिंगणात उतरेल. दुसऱ्या टप्प्यातील सामने १३ एप्रिलपासून सुरू होतील आणि ते बेंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि न्यू चंदीगड अशा १२ मैदानांवर खेळवले जातील.

या हंगामाचे ५ खास मुद्दे

यंदा आयपीएल ८४ सामन्यांपर्यंत विस्तारला आहे, ज्यात मागील हंगामापेक्षा तब्बल १० सामने अधिक आहेत. ही क्रिकेटप्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे. दुसरे महत्त्वाचे- कॅमेरून ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल ₹ २५.२० कोटींना विकत घेतले, ज्यामुळे तो आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रवींद्र जडेजा सीएसकेतून राजस्थान रॉयल्समध्ये गेला असून, त्या बदल्यात टी-ट्वेण्टी वर्ल्डकपचा ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ संजू सॅमसन आता सीएसकेच्या गळ्यातील ताईत बनला आहे हे संपूर्ण हंगामाची रंगत वाढवणारे आहे! चौथा मुद्दा- बेंगळुरू शहर उद्घाटन सोहळा आणि अंतिम सामना या दोन्हींचे यजमानपद भूषवणार आहे. पाचवा- २०२८पासून आयपीएल ९४ सामन्यांपर्यंत विस्तारण्याची योजना असून, पूर्ण डबल राऊंड-रॉबिन फॉर्मॅट परत येणार आहे. सहावा- धावांचा पाऊस पाडणारा वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये काय करतो याकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

आयपीएल २०२६ चा हंगाम म्हणजे केवळ क्रिकेट नाही, हा एक राष्ट्रीय उत्सव आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, महागाईचे सावट आणि राजकीय धामधुमीच्या पार्श्वभूमीवर, लाखो क्रिकेटप्रेमींसाठी हा हंगाम एक सुखद विरंगुळा ठरेल यात शंका नाही. आता चेंडू टाकला जाणार आहे, स्टेडियम गाजणार, स्क्रीन उजळणार, आणि क्रिकेटचा जल्लोष घराघरात पोहोचणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’?

पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. "ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार" या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही...

इराण-अमेरिका संघर्षात पुढचे ४८ तास महत्त्वाचे!

पश्चिम आशियातील युद्धज्वाळा आता थेट जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर येऊन ठेपल्या आहेत. एकीकडे इराणने भारतासाठी होर्मुझ खुले केले असले तरी दुसरीकडे, अमेरिका आणि इस्त्राईलला कडक इशारा दिला आहे. इराणने येमेनजवळील बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. लाल समुद्र आणि...

असा साजरा करा श्रीराम जन्मोत्सव!

श्रीरामनवमी! श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात्...
Skip to content