Homeएनसर्कलजाणून घ्या ‘ई-रुपी’...

जाणून घ्या ‘ई-रुपी’ या नव्या डिजिटल पेमेंटविषयी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्टला डिजिटल पेमेंट सुविधा, ई-रुपीचे उद्घाटन केले. हे एक रोखरहित, स्पर्शरहित डिजिटल पेमेंटचे साधन आहे. थेट लाभ हस्तांतरणात ई-रुपी पावती महत्त्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. डीबीटीद्वारे होणारे व्यवहार यामुळे अधिक प्रभावी होतील आणि त्यातून डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची आयुष्ये एकमेकांशी जोडण्याच्या क्षेत्रात, भारत कशी प्रगती करतो आहे, याचे ई-रूपी हे प्रतीक आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

-रुपी नेमके काय आहे आणि ते कसे काम करते?

ई-रुपी ही मुळात एक डिजिटल पावती आहे जी लाभार्थ्याला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा QR कोड संदेश रुपात मिळेल. ही एक प्री-पेड पावती (व्हाऊचर) आहे, जे तो/ती (लाभार्थी) कोणत्याही केंद्रात-जिथे ते स्वीकारले जाईल, तिथे जाऊन, ते दाखवून त्याच्या बदल्यात पैसे मिळवू शकेल.

उदाहरणार्थ, जर सरकारला आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या एखाद्या विशिष्ट दवाखान्यातील विशिष्ट उपचारांचा खर्च उचलायचा असेल, तर सरकार त्यांच्यासाठी आपल्या भागीदार बँकेच्या माध्यमातून एका निश्चित रकमेची प्री-पेड ई-रुपी पावती जारी करू शकते. त्या कर्मचाऱ्याला याबद्दल त्याच्या फिचर/स्मार्ट फोनवर एसएमएस किंवा QR कोडच्या माध्यमातून ही पावती मिळेल. मग तो/ती त्या विशिष्ट रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकेल आणि त्याच्या फोनवर आलेल्या ई-रुपी पावतीच्या माध्यमातून रुग्णालयाचे बिल देऊ शकेल.

म्हणजेच, ई-रुपी ही एकदा वापरली जाणारी, स्पर्शरहित रोखरहित पावती आधारित पैसे भरण्याची सुविधा आहे. याच्या मदतीने, उपयोगकर्ता, आपली पावती कुठल्याही डेबिट/क्रेडीट कार्डविना, डिजिटल एप नसतानाही, अथवा इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर न करताही भरू शकेल. ई-रुपी म्हणजे  डिजिटल चलन नाही, जे आणण्याचा भारतीय रिझर्व बँक विचार करत आहे. उलट ई-रुपी हे व्यक्ती-विशिष्ट, तसेच निश्चित उद्दिष्टासाठी जारी केले जाणारे डिजीटल व्हाऊचर आहे.

-रुपी ग्राहकासाठी कसे फायदेशीर आहे?

ई-रुपीसाठी लाभार्थ्याचे बँक खाते असण्याची गरज नाही, या इतर डिजिटल साधने आणि ई–रुपीमधील एक महत्त्वाचा फरक आहे. या सुविधेमुळे सुलभ, स्पर्शरहित आर्थिक व्यवहार होऊ शकतील आणि त्यासाठी आपली  व्यक्तिगत माहिती देण्याची गरजही पडणार नाही. केवळ दोन टप्प्यांच्या या प्रक्रियेत आपली वैयक्तिक माहिती सांगण्याची गरज नाही.

ई-रुपीचा आणखी एक लाभ म्हणजे, ही सुविधा साध्या फोनवरुनही वापरता येऊ शकेल. आणि म्हणूनच ती स्मार्ट फोन न वापरणाऱ्या अथवा इंटरनेट सुविधा नसलेल्या एखाद्या  जागीदेखील, सहज वापरता येईल.

पुरस्कर्त्यासाठी -रुपीचे काय फायदे आहेत?

थेट लाभ हस्तांतरण सुविधा अधिक बळकट करण्यात ई-रुपीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या सुविधेमुळे थेट लाभ हस्तांतरण अधिक पारदर्शक होऊ शकेल. यात पावती प्रत्यक्षपणे (कागदी) देण्याची गरज नाही. एका दृष्टीने कागदी पावतीचा खर्चही कमी होणार आहे.

सेवा प्रदात्याला या सुविधेचे काय लाभ मिळतील?

एक प्री-पेड पावती म्हणून, ई-रूपी सेवा प्रदात्याला प्रत्यक्ष पेमेंटची ग्वाही देऊ शकता.

-रुपी कोणी विकसित केले आहे?

राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या, भारतातील सर्व डिजिटल पेमेंट व्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने ई-रुपीचा शुभारंभ केला. देशात, रोखरहित व्यवहारांना चालना देणारी ही पावती-आधारित सुविधा आहे. वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सहायाने ही सुविधा विकसित करण्यात आली आहे.

-रुपी कोणत्या बँक्स जारी करू शकतील?

एनपीसीआयने ई-रुपी व्यवहारांसाठी 11 बँकांशी भागीदारी केली आहे. या बँका म्हणजे, एक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, इंड्सइंड बँक, कोटक महिन्द्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, भारतीय स्टेट बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया. भारत पे, भीम बडोदा मर्चंट पे, पाईन लॅब्स, पीएनबी मर्चंट पे आणि योनो बँक या एप्सवरदेखील ही सुविधा मिळू शकेल.

ई-रुपी उपक्रमात लवकरच अधिक बँका आणि एप्सदेखील सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

आता -रुपीचा वापर कुठे करतात येईल?

ई-रुपीची सुरुवात करण्यासाठी एनपीसीआयने 1600पेक्षा अधिक रुग्णालयांशी टाय-अप म्हणजेच करार केला असून, तिथे ही पावती वापरली जाऊ शकेल. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही काळात, ई-रुपीच्या वापरकर्त्यांची संख्या आणि व्याप्ती वाढणार आहे. अगदी खाजगी संस्थादेखील, आपल्या कर्मचाऱ्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी तसेच एमएसएमई क्षेत्र, व्यवसाय ते व्यवसाय (बी-टू-बी) व्यवहारांसाठी त्याचा वापर करू शकेल.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content