Homeबॅक पेजचेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे.

या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ यांची घन:श्याम परकाळेनिर्मित व दिग्दर्शित ‘नाती’ ही एकांकिका तसेच अयोध्येची उर्मिला, या कादंबरीच्या लेखिका डॉ. स्मिता दातार यांची मुलाखत तर दुसऱ्या दिवशी चित्रपट, मालिका आणि नाटक या तीनही माध्यमात सहज वावरणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता ओक यांचा नजराणा हास्याचा तसेच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित आणि पोलीस मन, या पुस्तकाचे लेखक निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अजित देशमुख यांची मुलाखत असे कार्यक्रम असतील.

मराठीवर प्रेम करणाऱ्या रसिकांनी या संमेलनास उपस्थित राहून या साहित्यिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content